महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 12, 2022, 7:32 AM IST

Updated : May 12, 2022, 7:59 PM IST

ETV Bharat / city

Maharashtra Live Breaking News; राज्यसभेच्या देशातील ५७ जागांसाठी निवडणूक जाहीर; राज्यातील सहा जागांवर होणार निवडणूक

Maharashtra Live Breaking News
Maharashtra Live Breaking News

19:07 May 12

मुंबईकरांना आता युपीआय अॅपवरूनही मिळणार लोकल ट्रेनचे तिकीट

उपनगरीय रेल्वेचा प्रवास करताना प्रवाशांना रेल्वे तिकिटासाठी तिकीट खिडक्यांवरील लांब रांगेचा सामना करावा लागत होता. मात्र, आता मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपल्या एटीव्हीएम मशीनवर एक अनोखी सुविधा दिली आहे. आता प्रवाशांना आपल्या मोबाईल फोनमध्ये असलेल्या फोन-पे, गुगल-पे आणि पेटीएम सारख्या युपीआय अँपवरून तिकिट सुविधा उपलब्ध करू देण्यात आली आहे.

18:16 May 12

राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक जाहीर

राज्यसभेच्या 57 जागांवर होणाऱ्या निवडणुकीबाबत एक मोठी ( elections for 57 Rajya Sabha seats ) बातमीआहे. देशातील 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार ( Rajya Sabha election date ) आहे. राज्यसभेत 245 सदस्य आहेत, बहुमताचा आकडा 123 आहे.

17:55 May 12

राज्यसभेवरील सहा जागांसाठी निवडणूक जाहीर

महाराष्ट्रातील राज्यसभेवरील सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 31 मे पर्यंत राज्यसभेच्या सदस्य पदासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असो 10 जून रोजी या साठी मतदान होईल. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल, काँग्रेसकडून पी चिदंबरम, यांची मुदत संपत आहे. तसेच भारतीय जनता पक्षाकडून विनय सहस्त्रबुद्धे, पियुष गोयल, आणि विकास महात्मे या तीन राज्यसभेवरील खासदारांचे मुदत संपत आहे. त्यामुळे या सहा जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

17:28 May 12

जालना भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथे पुतळा आणि वेशीवरून वाद, पोलिसांचा गोळीबार

जालना - छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि गावच्या प्रवेशद्वारावरील गोपीनाथ मुंडे प्रवेशद्वार लिहिलेलं बॅनर यावरून तणाव. संतप्त जमावाची दगडफेक. जमावाला पांगवण्सायाठी पोलिसांचा हवेत गोळीबार.

16:14 May 12

गोव्यात 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, रुम बॉयवर गुन्हा दाखल

पणजी - गोव्यातील परनेममधील अरामबोल हॉटेलमध्ये १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला (२८ वर्ष) अटक करण्यात आली आहे. आरोपी रवी हा कर्नाटकातील गदग येथील आहे. पीडित मुलगी व तिचे पालक ज्या हॉटेलमद्ये राहत होते. तेथे हा आरोपी रूम बॉय म्हणून काम करत होता. त्याच्यावर POCSO आणि 376 IPC अंतर्गत गु्हा दाखल केल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली.

15:42 May 12

गोव्यात 100 टक्के लसीकरण झाल्याने कोरोनामुक्त करण्यात यश - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

हैदराबाद - भाजपच्या तिसर्‍या कार्यकाळात पायाभूत सुविधा आणि विकासाचे काम सुरू आहे. रस्ते, पर्यटन, वैद्यकीय क्षेत्र, कौशल्य विकास आदी कामे हाती घेतली आहेत. 100% लसीकरण करून गोवा कोविडमुक्त करण्यात आम्हला यश आले आहे, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हैदराबादमध्ये म्हटले.

15:19 May 12

नांदेडमधील हुनगुंडे कुटुंबाचा मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

मुंबई - आठ कोटी रुपयांचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम केले. मात्र, केवळ 14 लाख रुपयाचे बिल देण्यात आले. बाकिचे बिल देण्यास बांधकाम विभागाचे कर्मचारी त्रास देत असल्याने नांदेड मधील वसमत गावातील हुनगुंडे कुटुंबाचा मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न.

14:21 May 12

ज्ञानवापी मशीद प्रकरणात वाराणसी कोर्टाचा मोठा निर्णय, कोर्ट कमिशनर हटणार नाही

ज्ञानवापी मशीद प्रकरणात वाराणसी कोर्टाचा मोठा निर्णय, कोर्ट कमिशनर हटणार नाहीत वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला

14:13 May 12

मंत्रालयाजवळ दांपत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई - मंत्रालयाजवळ दांपत्याचा आत्महत्येचा प्रयत्न. अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने धाव घेत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. बांधकाम विभागाचा कर्मचारी त्रास देत असल्याच्या कारणातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.

14:01 May 12

लाभार्थीचे बोलणे ऐकताना पंतप्रधान झाले भावूक

नवी दिल्ली -एका कार्यक्रमादरम्यान गुजरातमधील सरकारी योजनांच्या लाभार्थींपैकी एक अयुब पटेल यांच्याशी बोलत असताना, त्यांच्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न ऐकून पंतप्रधान मोदी भावूक झाले. ते म्हणाले, "तुम्हाला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही मदत हवी असल्यास मला सांगा." याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

13:34 May 12

गोवा - अरामबोल येथील हॉटेलमध्ये १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी २८ वर्षीय व्यक्तीला अटक

पणजी - परनेम गोवा येथील अरामबोल येथील हॉटेलमध्ये १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २८ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपी रवी असून तो गदग, कर्नाटकमधील आहे. हा पीडित मुलगी पाहुणे असलेल्या हॉटेलमध्ये रूम बॉय म्हणून काम करत होता. POCSO आणि 376 IPC अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

11:42 May 12

भाजप अर्धवटरावांचा पक्ष - शरद पवार

मुंबई -भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष आहे हे आता सर्वज्ञात आहे. पण अर्धे मुर्धे व्हिडीओ दाखवून, अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही. निदान पूर्ण व्हिडीओ दाखवण्याची अर्धांश हिंमत तरी ठेवायची होती. शरद पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ राष्ट्रवादी पक्षाच्या ट्विटर अकाउंटवर प्रसारित करण्यात आला आहे.

11:10 May 12

संजय राऊत यांनी ज्ञानवापी प्रकरणावर प्रतिक्रिया

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी ज्ञानवापी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. हे सर्व राजकीय लाभ मिळवण्यासाठी होत आहे. या मुद्यांमुळे देशाचे तुकडे होणार आहेत. राम मंदिरानंतर आता शांतता हवी असेही राऊत यांनी म्हटले आहे.

10:21 May 12

महाराष्ट्रात ठाकरे सरकार, कुणाचीही महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला हात लावायची हिंमत नाही - संजय राऊत

मुंबई - राज ठाकरे यांना मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमिवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे. कुणाचीही महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला हात लावायची हिंमत नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा राखण्याची जबाबदारी गृहखाते, गुप्तचर विभाग आणि महाराष्ट्र सरकारची आहे. ते ही जबाबदारी चोख बजावतील.

09:42 May 12

सेन्सेक्स 985 अंकांनी खाली, सेन्सेक्स 53,102 वर

मुंबई -मुंबई शेअर बाजारात आज सकाळीच मंदीची लाट दिसून आहे. सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स 985 अंकांनी खाली आला. त्यामुळे सेन्सेक्स 53,102 वर आला होता. निफ्टी 287 अंकांनी घसरून 15,879 वर आला.

09:33 May 12

दबावामुळे देशद्रोहाचे खटले भरणारे पोलीस अधिकारी आणि नोकरशाही यांच्यावर कारवाई करावी - खासदार गोपाळ शेट्टी

मुंबई - दबावामुळे लोकांवर अशा प्रकारचे देशद्रोहाचे खटले भरणारे पोलीस अधिकारी आणि नोकरशाही यांच्यावर कारवाई करावी, असे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी म्हटले आहे. एससीवरील देशद्रोहाचा खटला सरकार पुन्हा तपासत नाही तोपर्यंत स्थगित ठेवला आहे. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

09:23 May 12

चोंगकिंगमध्ये प्रवासी विमानाला धावपट्टीवर आग लागल्याने २५ जण जखमी

बीजिंग - चीनच्या चोंगकिंगमध्ये प्रवासी विमानाला धावपट्टीवर आग लागल्याने २५ जण जखमी झाले आहेत. टेक ऑफच्या वेळी धावपट्टीवरुन विमान घसरल्याने ही आग लागली. यावेळी विमान उड्डाण होणार होते.

08:59 May 12

व्यापारी जितेंद्र नवलानी यांच्याविरोधात लुकआउट नोटीस

मुंबई - महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) व्यापारी जितेंद्र नवलानी यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. ईडी अधिकार्‍यांचा जवळचा सहकारी असल्याच्या त्याच्यावर आरोप आहे. या आरोपावरून आणि ५९ कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला, असे पोलिसांनी सांगितले.

08:24 May 12

हवाई दलाच्या कर्मचाऱ्याला दिल्ली पोलिसांनी केली अटक

नवी दिल्ली - हवाई दलाच्या देवेंद्र शर्मा या कर्मचाऱ्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. शर्मा पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित असल्याचा पोलिसांना संशय आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून ही माहिती घेतल्याचा अंदाज आहे.

08:14 May 12

खासदार राणा यांचे लीलावती रुग्णालयात एमआरआय स्कॅन करताना फोटो क्लिक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई -अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे मुंबईतील लीलावती रुग्णालयात एमआरआय स्कॅन करताना फोटो क्लिक केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी कलम ४४८ आणि ३३६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालयाने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना तपासासाठी सादर केले आहे.

07:56 May 12

शरद पवार यांचे मानसिक संतुलन ढासळले

दिल्ली - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. त्यामुळे ते हिंदू देवतांवर टीका करत असल्याचं ट्विट सुनिल देवधर यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख @PawarSpeaks हिंदू देवांच्या श्रद्धांना ‘साला’ म्हणून शिव्या देऊन मानसिक संतुलन गमावले आहे. या अयशस्वी राजकारण्याने मी तुमच्या देवांचा ‘बाप’ आहे असे सांगून आपली निराशा दाखवली. लोकांनी नाकारण्यापूर्वीच त्यांनी राजकारण सोडलं पाहिजे. असे ते ट्विटमध्ये म्हणतात.

07:26 May 12

शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन

मुंबई - अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन झाले. आमदार लटके हे दुबईत त्यांच्या मित्राला भेटायला गेले होते. बुधवारी रात्री अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. रमेश लटके हे ५२ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

07:25 May 12

Maharashtra Live Breaking News_12 May 2022

उपनगरीय रेल्वेचा प्रवास करताना प्रवाशांना रेल्वे तिकिटासाठी तिकीट खिडक्यांवरील लांब रांगेचा सामना करावा लागत होता. मात्र, आता मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपल्या एटीव्हीएम मशीनवर एक अनोखी सुविधा दिली आहे. आता प्रवाशांना आपल्या मोबाईल फोनमध्ये असलेल्या फोन-पे, गुगल-पे आणि पेटीएम सारख्या युपीआय अँपवरून तिकिट सुविधा उपलब्ध करू देण्यात आली आहे.

राज्यसभेच्या 57 जागांवर होणाऱ्या निवडणुकीबाबत एक मोठी ( elections for 57 Rajya Sabha seats ) बातमी आहे. देशातील 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार ( Rajya Sabha election date ) आहे. राज्यसभेत 245 सदस्य आहेत, बहुमताचा आकडा 123 आहे. राज्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल, काँग्रेसकडून पी चिदंबरम, यांची मुदत संपत आहे. तसेच भारतीय जनता पक्षाकडून विनय सहस्त्रबुद्धे, पियुष गोयल, आणि विकास महात्मे या तीन राज्यसभेवरील खासदारांचे मुदत संपत आहे. त्यामुळे या सहा जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

Last Updated : May 12, 2022, 7:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details