काही दिवसांपूर्वी एका माणसाने मला फोन करून सांगितले की, तो मला मंत्रीपद मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो. मी लगेच पोलीस आणि देवेंद्र फडणवीस यांना कळवले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपींनी किती लोकांशी संपर्क साधला याची पोलीस चौकशी करत आहेत: भाजप आमदार राहुल कुल
Maharashtra Breaking News : दोन आठवड्यात निवडणुका घ्या; न्यायालयाची दिशाभूल करू नका : सर्वोच्च न्यायालय - Maharashtra update news
16:25 July 20
मंत्रीपद मिळवून देण्यासाठी आमदार राहुल कुल यांच्याकडे 100 कोटी रुपयांची मागणी
15:26 July 20
दोन आठवड्यात निवडणुका घ्या; न्यायालयाची दिशाभूल करू नका : सर्वोच्च न्यायालय
दोन आठवड्यात निवडणुका घ्या
न्यायालयाची दिशाभूल करू नका
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
ओबीसी आरक्षणाच्या प्रकरणावर आज न्यायमूर्ती खानविलकर यांच्या खंडपीठामुळे सुनावणी झाली. राज्यातील आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत आज युक्तिवाद करण्यात आला. राज्य सरकारने इम्पेरीकल डेटा गोळा करण्यासाठी बांठिया समिती नेमली होती. या समितीने अहवाल न्यायालयात सादर केला. समितीच्या अहवालानुसार राज्यात सरासरी 37 टक्के ओबीसी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
13:39 July 20
हजर राहण्यापासून ईडीकडून सूट मागितली-संजय राऊत
संसदेचे अधिवेशन सुरू आहे. मी हजर राहण्यापासून ईडीकडून सूट मागितली आहे. मी दिल्लीत असेन, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊत यांना आज सकाळी ११ वाजता ईडीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.
13:30 July 20
कोर्टाला मार्गदर्शक निकाल द्यावा लागेल- छगन भुजबळ
छगन भुजबळ यांनी आमदार अपात्रतेसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले, की आमदारांच्या पात्रापात्र ते संदर्भात आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात स्पष्टता अद्याप नाही. मंत्रिमंडळाच्या शपथविधी विषयी मी काही बोलू शकत नाही. कोर्टाला मार्गदर्शक निकाल द्यावा लागेल, असे राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी सांगितले.
13:29 July 20
योग्य निर्णय आमच्या बाजूने येईल-देवेंद्र फडणवीस
जी काय सुनावणी झाली आहे त्यांनी आम्ही समाधानी आहोत. योग्य निर्णय आमच्या बाजूने येईल. यावर अधिक बोलणे योग्य नाही. आम्ही सर्व कायदेशीर बाजूची पूर्तता केलेली आहे. घटनापिठासमोर सुनावणी होणे गरजेचे आहे. त्यांनी आम्हाला नोटीसी दिली आम्ही त्यांना नोटीसा दिली आहे, त्या संदर्भात स्टेटस को असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
13:27 July 20
166 लोकांचे पाठबळ टाळता येईल का? प्रवीण दरेकर
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की 166 लोकांचे पाठबळ टाळता येईल का? मोठ्या प्रमाणावर खासदार आणि आमदार दोन तृतीयांश पेक्षा अधिक आहेत. कायद्याच्या चौकटीत खेळत लोकांच्या हिताची खेळण्याचा प्रकार करू नये. शिंदे फडणवीस यांचे सरकार आले आहे. लोकांना कामाची अपेक्षा आहे. अशा वेळेस कायद्याचा कीस काढू नये. देशामध्ये लोकशाही चालते हुकूमशाही नाही. लोकशाहीमध्ये संख्येला महत्त्व असते आणि संख्या जर शिंदे यांच्या बाजूने असेल तर काय अडचण आहे असं वाटत नाही.
12:46 July 20
रनिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदी निवड
रनिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे.
12:42 July 20
हावडा येथे देशी दारू प्यायल्याने ७ जणांचा मृत्यू
हावडा येथे देशी दारू प्यायल्याने ७ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण आजारी आहेत. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण कळू शकेल, असे हावडा पोलिस आयुक्त प्रवीण कुमार त्रिपाठी यांनी सांगितले.
12:16 July 20
शिंदे विरुद्ध शिवसेना याचिकेवरील पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार
शिंदे विरुद्ध शिवसेना याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. दोन्ही पक्षांना २७ जुलैला प्रतिज्ञापत्र व सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पुढील सुनावणी १ ऑगस्टला घेण्यात येणार आहे.
12:13 July 20
गटनेत्याला बदलणं हा पक्षाचा अधिकार - सर्वोच्च न्यायालय
विधिमंडळात गटनेत्याला हटवण हा पक्षांतर्गत विषय - सर्वोच्च न्यायालय
गटनेत्याला बदलणं हा पक्षाचा अधिकार - सर्वोच्च न्यायालय
12:08 July 20
दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना
दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना..
मंगळवार पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार..
12:02 July 20
मोठ्या खंडपीठाकडे हे प्रकरण वर्ग करता येईल- सरन्यायाधीश
महाधिवक्ता तुषार मेहता यांचा युक्तिवाद सुरू...
दोन्ही बाजूंनी सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी..
मोठ्या खंडपीठाकडे हे प्रकरण वर्ग करता येईल- सरन्यायाधीश
या प्रकरणात सगळ्यालाच हरताळ फासलाय - मेहता
11:59 July 20
दोन्ही बाजूंनी सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी..
दोन्ही बाजूंनी सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी..
मोठ्या खंडपीठाकडे हे प्रकरण वर्ग करता येईल- सरन्यायाधीश
11:56 July 20
हरीश साळवेंच्या वेळ वाढवून घेण्याच्या मागणीवर कपिल सिब्बल यांचा आक्षेप
हरीश साळवेंच्या वेळ वाढवून घेण्याच्या मागणीवर कपिल सिब्बल यांचा आक्षेप
सर्व गोष्टी समोर असताना वेळ का वाढवायचा - सिब्बल
प्रकरण महत्त्वाच असल्याने तातडीने निर्णय गरजेच - सिब्बल
11:48 July 20
उत्तर दाखल करण्यासाठी हरिष साळवे यांनी मागितला वेळ
साळवे यांनी याचिकांवर उत्तर दाखल करण्यासाठी आणि पुढील आठवड्याकरिता वेळ मागितला आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर वेळ हा मुद्दा नाही. परंतु काही मुद्दे हे महत्त्वाचे घटनात्मक मुद्दे आहेत ज्यांचे निराकरण केले पाहिजे, असे म्हटले आहे.
11:46 July 20
लोकशाही धोक्यात आहे - कपिल सिब्बल
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे कॅम्पचे वरिष्ठ अधिवक्ता कपिल सिब्बल म्हणाले, की हे प्रकरण मान्य केले तर या देशातील प्रत्येक निवडून आलेले सरकार पाडले जाऊ शकते. 10 व्या शेड्यूल अंतर्गत बार असूनही राज्य सरकारे पाडता आली तर लोकशाही धोक्यात आहे.
11:45 July 20
शिंदे गटातील आमदारांना अंतिमरीत्या अपात्र ठरवा - सिंघवी
गुवाहाटीला जाण्या अगोदर शिंदे गटाचा अनधिकृत मेल - सिंघवी
मनु सिंघवी यांच्याकडून रेबिया प्रकरणाचा दाखला..
बंडखोर योग्य तर उपाध्यक्ष यांचा निर्णय चुकीचा हे कसं काय? सिंघवी
अध्यक्षांना रोखायचं व बहुमत चाचणीही घ्यायची हे चुकीचं - सिंघवी
दहाव्या सूचीनुसार फुटीर गटाने दुसऱ्या पक्षात विलीन होणे अनिवार्य - सिंघवी
शिंदे गट स्वतःला भाजपही म्हणत नाही - सिंघवी
अपात्रतेचा निर्णय नसताना बहुमत चाचणीत आमदारांचा सहभाग कसा - सिंघवी
शिंदे गटातील आमदारांना अंतिमरीत्या अपात्र ठरवा - सिंघवी
11:43 July 20
लक्ष्मण रेखेचे उल्लंघन न करता आवाज उठवणे बंडखोरी नाही - हरिष साळवे
मोठ्या गटाला दुसरे नेतृत्व मान्य या चूक काय? - साळवे
सीएमच्या राजीनाम्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा बंडखोरी नाही - साळवे
पक्षांतर्गत आवाज उठवणे बंडखोरी नाही - साळवे
नेत्याविरोधात आवाज ठेवणं अपात्रतेस कारण ठरत नाही - साळवे
लक्ष्मण रखेच उल्लंघन न करता आवाज उठवणे बंडखोरी नाही - साळवे
11:27 July 20
लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब
विरोधी पक्षांच्या खासदारांच्या घोषणाबाजीनंतर लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. जे सदस्य घोषणाबाजी करत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी चर्चेत भाग घ्यावा. संसदेने काम करावे अशी जनतेची इच्छा असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले.
11:11 July 20
शिंदे गट विरुद्ध शिवसेना प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
सर्वोच्च न्यालयात शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे. शिवसेनेच्यावतीने कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद सुरू झाला.
11:10 July 20
राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित
मान्सून अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
11:03 July 20
लोकसभेची उत्पादकता कमी करण्याचे धाडस करू नये, स्मृती इराणी यांचा राहुल गांधींना टोला
राजकीयदृष्ट्या अनुत्पादक राहुल गांधी यांनी लोकसभेची उत्पादकता कमी करण्याचे धाडस करू नये, असा टोला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लगावला आहे.
10:55 July 20
कोई नही है टक्कर मे, क्यूँ पडे हो चक्कर मे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
तणावाशिवाय, आपल्या सर्व शक्तींसह चांगले खेळा. 'कोई नही है टक्कर मे, क्यूँ पडे हो चक्कर मे' ही म्हण तुम्ही ऐकली असेलच, म्हणून राष्ट्रकुल खेळांमध्येही त्याच मनोवृत्तीने खेळा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या CWG 2022 संघाला केले आहे.
10:54 July 20
10:54 July 20
10:41 July 20
विरोधी पक्षांचे संसदेच्या आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन
पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खरगे आणि अधीर रंजन चौधरी महागाई आणि महागाईच्या मुद्द्यांवर संसदेतील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले.
10:11 July 20
200 कोटी लसीकरण डोसाचा गाठला टप्पा, पंतप्रधानांनी केले कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जुलै रोजी 200 कोटी लसीकरण डोस गाठल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. पंतप्रधानांनी सर्व लसीकरणकर्त्यांचे वैयक्तिकरित्या पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे. ते पत्र त्यांच्या CoWIN लॉगिन आयडीवरून डाउनलोड केले जाऊ शकते.
10:10 July 20
'अधीश' बंगल्याचे पाडकाम, राणे पुन्हा न्यायालयात
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील 'अधीश' बंगल्याचा काही अनधिकृत भाग अधिकृत करण्यासाठी केलेला दुसरा अर्ज दाखल करून घेण्यास योग्य आहे, हे आम्हाला पटवून द्या असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका व नारायण राणे यांच्याशी संबंधित एका रियल इस्टेट कंपनीला दिले. आमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार राहा, असे म्हणत न्यायमूर्ती आर. डी. धानुका व न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांच्या खंडपीठाने कालका रियल इस्टेट्सने दाखल केलेल्या याचिकेवर आता पुढील सुनावणी 25 जुलैला ठेवली आहे.
09:59 July 20
आमच्या गटनेतेपदाच्या पत्रावर लोकसभा अध्यक्षांकडून उत्तर नाही-संजय राऊत
ठाकरेंना सेनेत आम्हीच म्हणतील. रावसाहेब दानवे हे भ्रमिष्टावस्थेत आहे. आमच्या गटनेतेपदाच्या पत्रावर लोकसभा अध्यक्षांकडून उत्तर नाही. आम्हाला न्यायालयाकडून अपेक्षा असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
07:08 July 20
गुजरातमध्ये पावसाने केला हाहाकार
मुसळधार पावसाने गुजरातमध्ये धुमाकूळ घातला आहे. अरवली जिल्ह्यातील स्थानिकांचे सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याबरोबरच घरे आणि दुकानांमध्ये पाणी साचले.
06:50 July 20
बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले अभिनंदन, 'हे' आहे कारण
कोविड-19 लसीकरणात भारताने 200 कोटींचा टप्पा गाठला आहे. हे उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल मायक्रोसॉफ्टचे माजी संचालक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे.
06:44 July 20
मराठा आरक्षणाच्या निर्णयावर कर्नाटक सरकार काय घेणार निर्णय?
मराठा आरक्षणाच्या मागणीवर कर्नाटक सरकार संविधानानुसार कार्यवाही करेल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.
06:42 July 20
पहा, गुजरातमधील धबधब्याचा व्हिडिओ
डांग जिल्ह्यातील सापुतारा गिरा दोध धबधबा आहे. येथे संततधार पावसानंतर हा धबधबा कोसळतानाचे दृश्य विहंगम आहे.
06:24 July 20
राष्ट्रपती पदाची निवडणूक: द्रौपदी मुर्मू, भाजप नेत्यांविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
द्रौपदी मुर्मू, भाजप नेत्यांविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत निवडणूक संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
06:22 July 20
चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमधून ग्रामस्थांची एसडीआरएफच्या जवानांनी केली सुटका
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील घुगुस, बेलसणी आणि सोईत या पूरग्रस्त गावांतील ग्रामस्थांची एसडीआरएफच्या जवानांनी सुटका केली.
06:20 July 20
ठाण्यातील बँकेत चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्याकडूनच ३४ कोटींची चोरी- आरोपीला अटक
13 जुलै रोजी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला. एका बँक कर्मचाऱ्याने बँकेच्या तिजोरीतून 34 कोटी रुपये चोरले होते. याप्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 5.8 कोटी रुपये आणि एक वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल सुरेश होनराव यांनी दिली आहे.
06:17 July 20
श्रीलंकेतील भारतीय नागरिकांनो जागरुक राहा-भारतीय उच्चायुक्तालय
श्रीलंकेतील सध्याच्या परिस्थितीमध्ये, श्रीलंकेतील भारतीय नागरिकांनी ताज्या घडामोडींबद्दल जागरुक राहण्याची सूचना श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तालयाने केली आहे. आवश्यकता असल्यास, भारतीय नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधा, असे आवाहनही भारतीय उच्चायुक्तालयाने केले आहे.
06:16 July 20
गायक जस्टिन बायबर ऑक्टोबरमध्ये भारतात येणार
गायक जस्टिन बायबर ऑक्टोबरमध्ये भारतात येणार आहे.
06:15 July 20
शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद बनवतो, 100 कोटी द्या- आमदारांना फसवणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेकडून अटक
राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. त्यामुळे कॅबिनेट मंत्रीपद देण्याच्या नावाखाली राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराला शंभर कोटी रुपयांची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी वेशांतर करून हॉटेल ओबेराय येथे एका आरोपीला अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान आणखी तीन आरोपींची नावे समोर आले आहे.
06:04 July 20
Maharashtra Breaking news : हजर राहण्यापासून ईडीकडून सूट मागितली-संजय राऊत
मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Met Shivsena MP ) यांनी दिल्लीत शिवसेनेच्या (शिंदे गट) 12 खासदारांची भेट घेतल्यानंतर मोठे राजकीय नाट्य घडले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता पक्षाच्या १९ पैकी १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र सादर केले आहे. त्यात त्यांनी १२ खासदारांचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली आहे. लोकसभा अध्यक्षांनी शिंदे गटांच्या खासदारांची मागणी मान्य केली आहे. तर शिवसेना सभागृह नेतेपदी राहुल शेवाळे यांची निवड केली आहे. तर भावना गवळी यांना मुख्य व्हीप म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. ( हे लाईव्ह पेज आहे. दिवसभरात अपडेट होत राहणार आहे. )