मुंबई- पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने आज शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांची 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली.
Maharashtra Breaking News : संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांची ईडीकडून 9 तास चौकशी - Maharashtra live breaking news
22:51 July 19
संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांची ईडीकडून 9 तास चौकशी
20:29 July 19
ईडीकडून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक
मुंबई - नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे.
20:17 July 19
एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
महाराष्ट्रातल्या जनतेकडून मोठ्या प्रमाणात समर्थन
अडीच वर्षांपूर्वी व्हायला पाहिजे होते आता झालं
जनतेच्या मनातल्या सरकार आम्ही स्थापन केले
ओबीसी आरक्षण बाबत वकिलांशी चर्चा केली
केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पाठिंबा
कोणतीही काटकसर मदती बाबत होणार नाही
गृहमंत्री, पंतप्रधानांना धन्यवाद देतो
बारा खासदारांनी बाळासाहेबांच्या विचारांचे स्वागत केले आहे
लोकसभा स्पीकरला तसे पत्र दिले
महाराष्ट्रात सर्वसामान्य लोकांसाठी जेवढे चांगले काम करता येईल ते काम करू
लोकांचे सरकार कुठेही कमी पडणार नाही
14:57 July 19
मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली शिवसेनेच्या 12 खासदारांची दिल्लीत भेट
नवी दिल्ली -मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 12 खासदारांची दिल्लीत भेट घेतली आहे. शिंदे सध्या दिल्ली दौऱयावर आहेत.
12:22 July 19
शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या नाशिक कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात
शिंदे गटात 12 खासदार सहभाग असल्याची चर्चा,यात गोडसे यांचा ही सहभाग
-काही दिवसांपूर्वी शिवसेनेने भाजप सोबत जुळून घ्यावं असं केलं होतं वक्तव्य.
12:09 July 19
मार्गारेट अल्वा यांनी उपराष्ट्रपती पदाचा दाखल केला अर्ज
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी संसदेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
12:08 July 19
टीआरएसच्या खासदारांचे महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन
महागाईच्या या मुद्द्यांवर संसदेतील महात्मा गांधी पुतळ्यासमोर टीआरएसच्या खासदारांनी आंदोलन केले.
11:35 July 19
विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क दुसऱ्यांदा तुटला
-सततच्या पावसामुळे विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. दोन दिवसांच्या उसंतीनंतर झालेल्या पावसामुळे हिमायतनगर-उमरखेडच्या सीमेवरील गांजेगावच्या पुलावरून सोमवारी (ता. १८) सकाळपासून पाणी वाहत आहे. त्यामुळे विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क दुसऱ्यांदा तुटला. येथील वाहतूक ठप्प झाली आहे.
11:34 July 19
राज्यातील चार महिला आमदारांची तरुणाकडून आर्थिक फसवणूक
आई आजारी असल्याचं कारण देत मुकेश राठोड या तरुणाने राज्यातील चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक केली आर्थिक फसवणूक आहे. त्याच्या विरोधात पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
11:21 July 19
सभागृहात फलक आणल्याने कामकाज तहकूब-ओम बिर्ला
नियमानुसार, सभागृहात फलक आणण्याची परवानगी नाही. विरोधी खासदारांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आल्याचे असे लोकसभेची सभापती ओम बिर्ला म्हणाले.
11:15 July 19
महागाईच्या मुद्द्यावरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहाचे कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित
संसदेच्या दुसऱ्या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत महागाई आणि महागाईविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यसभा व लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.
10:42 July 19
मार्गारेट अल्वा आज उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार
मार्गारेट अल्वा आज उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत.
10:38 July 19
डॉलरच्या तुलनेत रुपयात सर्वात मोठी घसरण
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया हा आजपर्यंतच्या सर्वाधिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत ८० रुपयावर आली आहे.
10:37 July 19
महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये पूरस्थिती कायम
महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये पूरस्थिती कायम आहे. अनेक घरे पावसाच्या पाण्यात बुडाली आहेत. तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
10:37 July 19
आरबीआयकडून रायगड सहकारी बँकेवर निर्बंध
आरबीआयने रायगड सहकारी बँक लिमिटेड, मुंबईवर प्रत्येक ठेवीदारासाठी 15,000 रुपये काढण्याची मर्यादा समाविष्ट करून निर्बंध लादले आहेत. बँक कोणतेही कर्ज/अॅडव्हान्स मंजूर किंवा नूतनीकरण करू शकत नाही, कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही, निधीचे कर्ज घेणे आणि नवीन ठेवी स्वीकारणे इत्यादींसह कोणतेही दायित्व स्वीकारू शकत नाही.
10:31 July 19
महागाईविरोधात राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांची संसदेबाहेर निदर्शने
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी निदर्शने करण्या सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसदेत महागाई आणि भाववाढ या मुद्द्यांवर विरोधकांच्या निदर्शनात सामील झाले.
09:55 July 19
खासदारांच्या घरासाठी असलेल्या सुरक्षा यंत्रणेचा गैरवापर- संजय राऊत
कोणत्याही लढाईसाठी दोन हात करण्याची तयारी आहे. छुपे वार सुरू आहेत. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे प्रयत्न आहे. शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री, त्यांचे दौरे होणारच अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
09:36 July 19
नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकारी निलेश (बाळा) कोकणे यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला
शिवसेना पदाधिकारी निलेश (बाळा) कोकणे यांच्यावर नाशिकच्या एमजी रोड भागात अज्ञात व्यक्तींकडून हल्ला झाल्याची घटना 18 तारखेला रात्री घडली. यात कोकणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला असून भद्रकाली पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. नेमका हल्ला कशावरून झाला याबाबत अद्याप समजू शकले नाही. मात्र या घटनेमुळे शिवसेनेत खळबळ उडाली असून रुग्णालया बाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. हल्लेखोरांना त्वरित अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली..
09:32 July 19
नागपूरमधील भंगार गोदामात स्फोट एकाचा मृत्यू
नागपुरातील पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली घटना एका भंगाराच्या गोदामात पुलगाव येथील आयुध निर्माणीतून आलेल्या भंगारात स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. पारडी येथील भंगार व्यापाऱ्याने पुलगाव येथील आयुध निर्माण भांडरातून लिलावात काही भंगार खरेदी करून आणले होते. भंगार व्यापाऱ्याकडील कर्मचारी त्यापैकी एक सेल कापताना त्यात स्फोट झाला. त्यामध्ये गुड्डू रतनेरे या 52 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक जण जखमी असल्याची माहिती आहे.
08:20 July 19
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा आणि चिमूरच्या पूरग्रस्त भागाची करणार पाहणी
चंद्रपूर - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते चिमूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. वर्धा आणि चिमूर या भागाची ते पाहणी करणार आहेत. वर्धा जिल्ह्याचा दौरा आटोपून ते दुपारी 1.15 वाजता चिमूर येथे दाखल होणार आहेत. यादरम्यान ते पूरग्रस्त गावांना भेट देणार आहेत. दुपारी 2.15 वाजता ते येथून विभागीय आढावा बैठकीसाठी नागपुरकडे रवाना होणार आहे
08:12 July 19
पुण्यात रात्री इलेक्ट्रिक बाईक शोरुमला आग लागल्याने ७ दुचाकींचे नुकसान, जीवितहानी नाही
पुणे शहरातील गंगाधाम परिसरात काल रात्री इलेक्ट्रिक बाईक शोरूमला आग लागली. त्यामुळे सुमारे 7 बाईकचे नुकसान झाले, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पुणे अग्निशमन विभागाने म्हटले आहे.
07:11 July 19
वर्धा जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, मदतकार्य सुरू
वर्धा जिल्ह्यातील काही भागात पूरस्थिती गंभीर आहे. कारण या भागात धरणे ओसंडून वाहत असल्याने संततधार पाऊस पडत आहे. सामान्य जनजीवन प्रभावित होत असताना बचाव कार्य सुरू आहे.
07:09 July 19
विधानभवनातील मतपेट्या दिल्लीला रवाना
राष्ट्रपती पदाकरिता विधानभवन, मुंबई येथे मतदान झाल्यानंतर सीलबंद, मतपेटी , इतर निवडणूक साहित्य नवी दिल्ली येथे पाठविण्यात आले आहे. २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजाविली आहे.
07:07 July 19
उकाई धरणातून 60,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग
गुजरातमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार केला आहे. तापी नदीच्या उकाई धरणातून 60,000 क्युसेक पाणी सोडण्यात आले.
06:53 July 19
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत मध्यरात्रीनंतर दाखल, म्हणाले...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत मध्यरात्रीनंतर दाखल झाले. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, शिवसेनेचे खासदार आम्हाला भेटतील. आमच्याकडे 12 नव्हे तर 18 खासदार आहेत. आमचा आमच्या न्यायव्यवस्थेवर अढळ विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते, असे त्यांनी सांगितले.
06:40 July 19
गायक भूपिंदर सिंह यांचे पार्थिव मुंबईतील स्मशानभूमीत आणले..
गायक भूपिंदर सिंह यांचे पार्थिव मुंबईतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. भूपिंदर सिंग अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांची पत्नी मिताली सिंग सांगतात की ते गेल्या 9 दिवसांपासून रुग्णालयात होते आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
06:15 July 19
Maharashtra Breaking News : शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या नाशिक कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात
मुंबई- प्रसिद्ध गझल गायक भूपिंदर सिंह यांचे निधन झाले आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भूपिंदर सिंह हे ८२ वर्षांचे होते. भूपिंदर सिंह यांच्या पत्नी मिताली सिंह यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. भूपिंदर सिंह हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. नुकतेच त्यांना मुंबईतील क्रिटिकेअर एशिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पत्नी मिताली यांनी सांगितले की, भूपिंदर सिंह यांचे सोमवारी निधन झाले आणि मंगळवारी अंतिम संस्कार केले जातील. त्यांना पोटाशी संबंधित आजार होता.