महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Breaking News Live : नागपुरात भंगार गोदामात स्फोट; एकाचा मृत्यू - राष्ट्रपती निवडणूक २०२२

Maharashtra breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Jul 18, 2022, 6:47 AM IST

Updated : Jul 18, 2022, 8:37 PM IST

20:36 July 18

नागपुरात भंगार गोदामात स्फोट; एकाचा मृत्यू

नागपुरातील पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली घटना एका भंगाराच्या गोदामात पुलगाव येथील आयुध निर्माणीतून आलेल्या भंगारात स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. पारडी येथील भंगार व्यापाऱ्याने पुलगाव येथील आयुध निर्माण भांडरातून लिलावात काही भंगार खरेदी करून आणले होते. भंगार व्यापाऱ्याकडील कर्मचारी त्यापैकी एक सेल कापताना त्यात स्फोट झाला. त्यामध्ये गुड्डू रतनेरे या 52 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक जण जखमी असल्याची माहिती आहे.

15:18 July 18

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर

मंत्रिमंडळ विस्तार पूर्वी मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा

20 जुलैला सर्वोच्च न्यायालयात देखील सुनावणी

त्या पार्श्वभूमीवर दिल्ली दौरा महत्त्वाचा

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी दौऱ्यादरम्यान चर्चा होण्याची शक्यता

14:01 July 18

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी दोन वेळा चर्चा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मध्यप्रदेशमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. तेरा लोकांचे मृतदेह मिळाले आहेत. उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे. तेथील शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी दोन वेळा चर्चा झाली आहे. मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत जाहीर केली आहे.

13:55 July 18

नर्मदा बस अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाखांची मदत - मुख्यमंत्री

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.

13:48 July 18

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नर्मदा बस अपघातावर व्यक्त केला शोक

मध्य प्रदेशातील धार बस दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. बचाव कार्य सुरू आहे. स्थानिक अधिकारी शक्य ती सर्व मदत करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

13:07 July 18

महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मृतांची संख्या 105 वर पोहोचली

महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मृतांची संख्या 105 वर पोहोचली आहे.

13:03 July 18

दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इंदोर-अमळनेर ही एसटी बस मध्यप्रदेशातील धार येथे पुलावरून नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत.काही लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे. बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी हे मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिली.

12:51 July 18

नर्मदा बस अपघाता संदर्भात एसटी महामंडळाकडून हेल्पलाईन नंबर जारी

अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केली आहे. बसचा क्रमांक MH40N9848 आहे. चालकाचे नाव चंद्रकांत एकनाथ पाटील आहे. तर वाहकाचे नाव प्रकाश श्रावण चौधरी आहे. ही बस इंदूरमार्गे अमळनेरला येत होती. ही बस इंदूरहून सुटण्याची वेळ साडेसात वाजता आहे. तर अपघात हा खलघाट अणि ठीगरीमध्ये नर्मदा पुलावर झाला आहे.

12:40 July 18

नर्मदा बस अपघात: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंदूर येथील बस अपघाताची माहिती घेतली आहे. त्यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे बचावकार्य व मदतीसाठी आभार मानले आहेत.

12:35 July 18

एनडीएचे उमेदवार म्हणून जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाकरिता भरला अर्ज

एनडीएचे उमेदवार म्हणून जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एचएम अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर भाजप नेते उपस्थित होते.

12:23 July 18

President Election 2022: वैचारिक मतभेद असतील, पण आदिवासी महिलेला पाठिंबा- आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रपती मतदानाविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, की वैचारिक मतभेद असतील. पण एका आदिवासी महिलेला पाठिंबा दिला आहे. त्या राजकारणात जाणार नाही. मतदान कसे झालय हे मतमोजणी नंतर कळेल. देशातील काही भागात अदिवासी भागात सोयी सुविधा नाहीत. आम्ही गेल्यानंतर अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला. दिपाली सय्यद यांनी लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेटणार असल्याचे म्हटले होते. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी तुम्ही सोसर्कडून माहिती घ्या, असे म्हटले आहे. इंदूरमधील दुर्घटनेतील लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

12:17 July 18

बस दुर्घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल- दीपक केसरकर

इंदूरहुन येणाऱ्या बस दुर्घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आम्ही अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या दु:खात सहभागी आहोत. राज्याकडून योग्य मदत केली जाईल, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले.

12:14 July 18

एसटी बसला मध्यप्रदेशमध्ये अपघात १२ जणांचा मृत्यू

इंदूरहून पुण्याला जाणारी महाराष्ट्र रोडवेजची बस धार जिल्ह्यातील खलघाट संजय सेतूवरून पडल्याने १२ जण ठार, १५ जणांना वाचवण्यात यश आले, असे मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.

12:03 July 18

राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

महागाई आणि जीएसटी दरवाढीवरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत निदर्शने केली आणि सभागृहाच्या वेलमध्ये जाऊन आंदोलन केले. राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले आहे.


11:09 July 18

राष्ट्रपती निवडणूक : व्हीलचेअर येत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मतदान

भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे खासदार मनमोहन सिंग यांनी संसदेत भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत मतदान केले आहे. ते व्हीलचेअर मतदानासाठी आले होते.

11:07 July 18

राष्ट्रपती निवडणूक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मतदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती निवडणुकीत मतदान केले आहे.

10:54 July 18

आमचं एकही मत फुकट जाणार नाही - दीपक केसरकर

आमचं एकही मत फुकट जाणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. आमच्या मतांचा आकडा २०० च्या वर जाईल. मतदारा आपल्या सद्सदविवेक बुध्दीला जागृत ठेवून मतदान करतील, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

10:40 July 18

राष्ट्पती मतदान निवडणूक : योगी आदित्यनाथ यांनी केले मतदान

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान केले.

10:16 July 18

राष्ट्रपती निवडणूक २०२२: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मतदान

राष्ट्रपती निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मतदान केले आहे.

10:11 July 18

राष्ट्रपती पदाची आज निवडणूक; देशभरात आमदार आणि खासदार करणार मतदान

राष्ट्रपती पदाची आज निवडणूक होत आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये आमदार आणि खासदार मतदान करणार आहेत.

10:02 July 18

द्रौपदी मुर्मू यांना २०० आमदारांपेक्षा जास्त आमदारांचे समर्थन भेटणार- चंद्रकांत पाटील

आज होत असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यातून शिंदे गट व भाजप यांचे एकंदरीत १६५ आमदार असून शिवसेनेने समर्थन दिल्याकारणाने ही संख्या आता १८० झाली आहे. तरीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्रोपदी मुर्मू यांना २०० आमदार मतदान करतील असे सांगितलेले आहे. या उलट आता चंद्रकांत पाटील यांनी द्रौपदी मुर्मू यांना २०० पेक्षा जास्त आमदार मतदान करतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

09:49 July 18

आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान, हे अधिवेशन महत्त्वाचे-पंतप्रधान

संसदेच्या मान्सून अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी माध्यमांशी बोलताना म्हणाले, की हे अधिवेशन देखील महत्त्वाचे आहे. कारण सध्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका होत आहेत. आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या कालावधीत नवे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देशाला मार्गदर्शन करणार आहेत.

09:31 July 18

कोलकात्यात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता आमदारांची बस पोहोचली विधानसभेजवळ!

पश्चिम बंगालमधील भाजप आमदारांना घेऊन जाणारी बस राज्य कोलकाता विधानसभेत आली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ते आज मतदान करणार आहेत.

09:17 July 18

द्रौपदी मूर्मू यांचा विजय निश्चित, महाविकास आघाडीचे अस्तित्व दिसत नाही-आशिष शेलार

द्रौपदी मूर्मू यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास भाजप आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला. रेकॉर्ड ब्रेक अशी मत आम्हाला भेटतील. द्रौपदी मुर्मु यांना पक्ष मर्यादा बंधन सोडून सर्वपक्षीय समर्थन मिळेल. महाराष्ट्रात आम्हाला सर्वाधिक मते मिळतील. तो सुद्धा एक इतिहास रचला जाईल. मला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे अस्तित्व कुठे दिसत नाही. रोज तोंडावर आपटले ते पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानपरिषद राज्यसभेच्या निवडणुकीला सुद्धा ते हेच म्हणाले होते आमचे मत फुटणार नाही. आज पक्ष मर्यादा झिडकारून आमदार द्रौपदी मुर्मु यांना मतदान करतील. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागेल. काही लोकांना सकाळी उठून बोलायची सवय आहे.

09:15 July 18

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आमची मते फुटणार नाहीत-बाळासाहेब थोरात

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आमची मते फुटणार नाहीत. काँग्रेसची ४४ मते आमचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना भेटतील. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांची मतेही यशवंत सिन्हा यांनाच भेटतील. ही लढाई जाती-धर्माची आम्ही मानत नाही. लोकशाही मोडायला भाजप निघालेला आहे. ही विचाराची लढाई आहे. जाती धर्माची नसल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. राज्यघटना व पक्षांतर बंदीचा विचार केला तर आम्हाला न्याय भेटेल अशी आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.

07:49 July 18

पूंछ येथे अपघाताने ग्रेनेड स्फोट, अधिकाऱ्यासह जवान गंभीर जखमी

रविरारी रात्री, मेंढर सेक्टर, नियंत्रण रेषेवर जवान आपले कर्तव्य बजावत असताना पूंछ येथे अपघाताने ग्रेनेड स्फोट झाला. या स्फोटात काही जवान जखमी झाले आहेत. उपचारादरम्यान एक अधिकारी आणि एक जेसीओ गंभीर जखमी झाल्याचे जम्मूचे संरक्षण जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले.

07:32 July 18

नागपुरात एकाच शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

नागपुरातील जयताळा परिसरातील एका खासगी शाळेतील ३८ शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी या मुलांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती नागपूर जिल्हा आरोग्य कार्यालयाने दिली आहे.

07:29 July 18

एनडीआरएफच्या जवानांकडून गडचिरोलीत पूरग्रस्त भागात मदतकार्य

एनडीआरएफच्या जवानांनी गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात मदतकार्य केले. जवानांनी पुराच्या संकटात सापडलेल्या लोकांना विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

07:02 July 18

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचाला पुराचा फटका, जनजीवन विस्कळित

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचामध्ये मोठ्या प्रमाणात जमीन पूराच्या पाण्याखाली गेली आहे. कारण या भागात पसरलेल्या पूरस्थितीमुळे सामान्य जनजीवन प्रभावित होत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित होत आहे.

06:50 July 18

अमेरिकेतील इंडियानात गोळीबार, हल्लेखोरासह तिघांचा मृत्यू, तिघे जखमी

अमेरिकेतील ग्रीनवुड पार्क मॉल, इंडियाना येथे रविवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाला. घटनास्थळावर पोलीस पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये शूटर असल्याचे महापौर मार्क डब्ल्यू मायर्स

06:23 July 18

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी दोन वेळा चर्चा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई-शिवसेनेतील बंडखोरीनंतर जिल्हापातळीवरही धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक ( Mp sanjay Mandlik ) हे सुद्धा आता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून द्रौपदी मुर्मू ( President election ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे यूपीए कडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत एकनाथ शिंदे व भाजप यांच्याकडे १६५ आमदार आहेत.

Last Updated : Jul 18, 2022, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details