महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Breaking News : नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्याकरिता ईडीने मागितला वेळ

Maharashtra Live breaking  news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Jul 15, 2022, 6:33 AM IST

Updated : Jul 15, 2022, 2:04 PM IST

14:00 July 15

नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्याकरिता ईडीने मागितला वेळ

मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी ईडीने आणखी वेळ मागितला आहे. विशेष पीएमएलए न्यायालयात १९ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

13:33 July 15

मुख्यमंत्री यांच्या मागे मोठे षडयंत्र भाजप करत आहे- सुप्रिया सुळे यांचा आरोप

पुणे- हे जे नवीन सरकार आल आहे ते खुप कन्फ्युज सरकार आहे. मुख्यमंत्री यांचा एक मार्गदर्शक असतो. पण मुख्यमंत्री यांचा अपमान आहे. हे महाराष्ट्राला शोभणारा नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे राज्याचा अपमान आहे. मला त्या आमदारांना एक स्वाभिमानी महिला म्हणून प्रश्न विचारायचं आहे की अनेक प्रश्न तुम्ही उपस्थित करून स्वाभिमान जागा करून तुम्ही बाहेर पडला मग आत्ता स्वाभिमान गेला कुठे...या राज्याचा मुख्यमंत्री हा कोणत्या पक्षाचा नव्हे तर राज्याचा असतो.

13:33 July 15

शेतकऱ्यांनी अडवला अजित पवारांचा ताफा

अकोले येथील अगस्ति सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असतांना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व्यासपीठावर जाऊन थेट सवाल करण्याचा इशारा ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी दिला होता. पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने सभेपूर्वीच सावंत यांना ताब्यात घेतले आहे.

13:08 July 15

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवासस्थानी घेतली भेट

12:42 July 15

उद्या दिल्लीत एकत्र बसून चर्चा करणार आहोत- शरद पवार

संसदेच्या आवारात निषेध करण्यास परवानगी नसल्याबाबत सर्व राजकीय पक्षांचे नेते उद्या दिल्लीत एकत्र बसून चर्चा करणार आहोत. अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपुरात दिलील

12:01 July 15

मुंबई उच्च न्यायालयाने दिला गडचिरोलीतील नक्षलवादी सत्यनारायण रानी यांना जामीन

मुंबई उच्च न्यायालयाने गडचिरोलीतील नक्षलवादी सत्यनारायण रानी यांना जामीन दिला आहे. सत्यनारायण हा गडचिरोली नक्षल हल्यात आरोपी असून कथित नक्षल अजेंट निर्मला उपगांतीचा पति आहेत. सत्यनारायण आणि उपगांती या दोघांना गडचिरोली नक्षल बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात अटक करण्यात आले होते.

10:50 July 15

महाविकास आघाडीच्या निर्णयाला शिंदे सरकारने स्थगिती, हे सरकार हिंदुद्रोही- संजय राऊत

महाविकास आघाडीच्या ५ निर्णयाला शिंदे सरकारने स्थगिती दिली असल्यास हे सरकार हिंदुद्रोही असल्याची टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली.

10:35 July 15

साईबाबा व्‍दारकामाई मंदिराचे दर्शनाच्‍या वेळेत बदल

साईबाबा संस्‍थानच्यावतीने साईबाबा व्‍दारकामाई मंदिराचे दर्शनाच्‍या वेळेत बदल करण्‍यात आले असून दिनांक 14 जुलै 2022 पासुन साईबाबांची शेजारती होईपर्यंत व्‍दारकामाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली. व्‍दारकामाईस अनन्‍य साधारण महत्‍व आहे. त्‍या अनुषंगाने संस्‍थानच्‍या व्‍यवस्‍थापन समितीच्‍या नुकत्‍याच झालेल्‍या बैठकीत साईबाबांच्या शेजारती होईपर्यंत व्‍दारकामाई मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी खुले ठेवण्‍याबाबतचा निर्णय घेण्‍यात आला असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे

10:33 July 15

दिल्लीमधील हॉटेलच्या फर्निचरला लागली आग

दिल्लीतील इमारतीत असलेल्या पहिल्या मजल्यावरील 'कॅफे हाय 5' या रेस्टॉरंटमधील फर्निचरला आग लागल्याचे वृत्त आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही.

08:39 July 15

पालघर जिल्हा, पुणे आणि सातारा येथे आज ऑरेंज अलर्ट, २४ तासांत ४ जणांचा पावसाने मृत्यू

पालघर जिल्हा, पुणे आणि सातारा येथे आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये पावसाळ्यात एकूण ९९ जणांचा तर गेल्या २४ तासांत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

08:04 July 15

पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न-एकनाथ शिंदे

पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी बारकाईने निरीक्षण करत आहे. सर्व अधिकारी माझ्या संपर्कात आहेत. सर्व डीएम मैदानात आहेत. लोकांच्या सुरक्षेसाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

06:48 July 15

जम्मू काश्मीरमध्ये बस अपघात; अमरनाथ यात्रेचे यात्रेकरू जखमी

काझीगुंड येथील बद्रगुंड भागात झालेल्या बस अपघातात अमरनाथ यात्रेचे यात्रेकरू जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले

06:44 July 15

राष्ट्रपती निवडणुकीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना विक्रमी मतदान करू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रपती निवडणुकीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला आहेत. आम्ही आदिवासींसाठी काम करतो. आम्ही आदिवासींना पाठिंबा देतो. या निवडणुकीत, आम्ही सर्व विक्रम मोडू. प्रत्येकजण पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली द्रौपदी मुर्मू यांना मतदान करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

06:41 July 15

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीचे निधन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे न्यूयॉर्क शहरात निधन झाले आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली, “ती एक अद्भुत, सुंदर आणि आश्चर्यकारक स्त्री होती. ती उत्कृष्ट आणि प्रेरणादायी जीवन जगल्याचे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

06:36 July 15

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडी कार्यालयात आज हजर राहण्याचे समन्स

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही आहे. गुरुवारी ईडीने बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात पुन्हा चौकशी करण्याकरिता दिल्लीतील ईडी कार्यालयात आज 15 जुलैला रोजी हजर राहण्याकरिता समन्स पाठवले आहे. मागील आठवड्यातदेखील ईडीने संजय पांडे यांची चौकशी केली होती.

06:18 July 15

Maharashtra Breaking News : नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्याकरिता ईडीने मागितला वेळ

मुंबई - महानगरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणापैकी तानसा धरण गुरुवारी (१४ जुलै २०२२) रात्री ८.५० वाजता ओसंडून वाहू लागला आहे. या धरणाला एकूण ३८ दरवाजे आहेत, त्यापैकी रात्री ९.५० पर्यंत ९ दरवाजे उघडण्यात आले आहेत अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली. मुंबईमध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचप्रमाणे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणाच्या परिसरात म्हणजेच पालघर आणि नाशिक परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे

Last Updated : Jul 15, 2022, 2:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details