राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगर पंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका स्थगित करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार होते.
Maharashtra Live Breaking News : 92 नगर परिषदा आणि चार नगर पंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका स्थगित - महाराष्ट्र पाऊस अपडेट
16:48 July 14
92 नगर परिषदा आणि चार नगर पंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका स्थगित
13:59 July 14
अमरावती शहरात दोन मजली इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही
अमरावती शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या गांधी चौक ते अंबादेवी मंदिर मार्गावर असणारी दोन मजली इमारत शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास कोसळल्यामुळे खळबळ उडाली आहे. गत 24 तासांपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे ही इमारत खाली कोसळली आहे.
13:46 July 14
विशाळगडावरील बुरुज ढासळला
गडावर जाण्यासाठी लोखंडी जिना आहे त्याच्या बाजूचा दगडी बुरुज ढासळला आहे. हा लोखंडी जिना वाहतुक करणेसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी रोडने लोकं गडावर येत- जात आहेत. पोलीस निरीक्षक, शाहुवाडी पोलीस ठाणे यांनी माहिती दिली आहे. पन्हाळा गडानंतर आता विशाळगड सुद्धा ढासळत चालला आहे.
13:32 July 14
मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे महत्त्वाचे घेण्यात आले निर्णय
- बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदान करण्यात येणार
- आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पुन्हा पेन्शन
- बुलेट ट्रेन प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांकडून अंतिम मंजुरी
- आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहे.
- सरपंच, नगराध्यक्षांची थेट जनतेमधून निवड होणार आहे.
13:19 July 14
राज्य सरकारकडून इंधनावरील कर कपातीची घोषणा
पेट्रोलवर ५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर डिझेलवर ३ रुपयांची कपात करण्यात आली आहे.
13:05 July 14
शिवसेना नेते संजय राऊत यांचे शिवडी न्यायालयाने काढलले जामीन पात्र वॉरंट रद्द
डॉ. मेघा सोमय्या यांच्या मानहानी प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांचे शिवडी न्यायालयाने काढलले जामीन पात्र वॉरंट रद्द झाले आहे. चार जुलैला हजर न राहिल्याने वॉरंट काढण्यात आले होते. संजय राऊत यांनी वॉरंटची रद्द करण्याची 5000 रुपये रक्कम भरून वॉरंट रद्द केला आहेय या प्रकरणावर पुढील सुनावणी 18 जुलै रोजी होणार आहे
12:55 July 14
राष्ट्रपतीदाच्या निवडणुकीयत शरद पवारांनी द्रोपदी मुर्मु यांना पाठिंबा द्यावा; खासदार नवनीत राणा यांचे आवाहन
अमरावती- राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार असणाऱ्या द्रौपदी मुर्मु या आदिवासी समाजाच्या आहे. देशातील आदिवासी समाजाला देखील देशाच्या मुख्य पदावर मान मिळायला हवा यामुळेच आपण सर्वांनी मिळून द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा द्यायला हवा. आम्ही शरद पवार यांना आदरणीय मानतो. शरद पवार यांनी देखील द्रौपदी मुरमुन्ना पाठिंबा देऊन आपण सर्व आदिवासी समाजाच्या पाठीशी आहोत असा संदेश द्यावा असे आवाहन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केले आहे.
12:38 July 14
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद, मंत्रिमंडळातील निर्णय करणार जाहीर
केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असलेल्या मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस १ वाजता पत्रकार परिषदेत देणार आहेत.
12:10 July 14
मंत्रिमंडळाच्या बैठक सुरू, इंधनावरील व्हॅट कमी होणार का?
मंत्रिमंडळ बैठक सुरू आहे. राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. पीक पाणी, कोविड, शेती नुकसान यासह इतर महत्वाच्या बाबीचा आढावा घेण्यात येत आहे. इंधनावर लावलेला व्हॅट कमी करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
11:25 July 14
पालघरमधील पुरात अडकलेल्या १० कामगारांची बचाव पथकाकडून सुटका
13 जुलै रोजी पालघरमधील वैतरणा नदीत जीआर पायाभूत सुविधांचे दहा कामगार अडकले होते. पालघर तहसीलदारांकडून विनंती मिळाल्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने बचाव कार्यासाठी हालचाल केली आणि रात्रभर सतत जागरुकता ठेवली. सर्व 10 कामगारांची घटनास्थळावरून यशस्वीरित्या सुटका आली आहे.
11:24 July 14
एसडीआरएफच्या पथकाने आज १५ जणांची भंडारामधून सुटका
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे एसडीआरएफच्या पथकाने आज १५ जणांची सुटका केली. पूरसदृश परिस्थितीमुळे ते एका मंदिरात अडकले होते
11:23 July 14
गुजरातमधील तीन नद्यांना पूर
नवसारी जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा, कावेरी आणि अंबिका या तीन नद्या पूरस्थितीत आहेत. काल रात्री पूर्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. लगतच्या भागात 40,000 लोक बाधित, 2500 लोकांना सुरक्षित मदत छावण्यांमध्ये हलवल्याचे नवसारी डीएम अमित प्रकाश यादव यांनी सांगितले.
11:13 July 14
चंद्रपूरमध्ये अनेक घरांमध्ये शिरले पाणी
संततधार पावसामुळे जिल्ह्यातील इरई धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर चंद्रपूर शहरातील विविध निवासी वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे.
11:11 July 14
पुण्यात भिंत कोसळली; अग्निशमन विभाग आणि स्थानिकांनी 11 जणांची केली सुटका
पुण्यातील कोंढवा परिसरात आज सकाळी एका रिकाम्या घराची भिंत कोसळल्याने अग्निशमन विभाग आणि स्थानिकांनी 11 जणांची सुटका केली. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पुणे अग्निशमन विभागाने म्हटले आहे.
10:33 July 14
गद्दार हा शब्द असंसदीय नाही- संजय राऊत
द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा ही राजकीय भावना नाही, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
09:44 July 14
उमरखेड, महागावमध्ये पूरस्थिती, अनेक गावांचा तुटला संपर्क
यवतमाळच्या महागाव व उमरखेड तालुक्याला अतिपावसाचा तडाखा बसला आहे. शेकडो हेक्टर शेती क्षेत्रात पावसाचे पाणी शिरले आहे. शेतांना तलावाचे स्वरूप आल्याने पिके पाण्यात बुडाली आहेत. तर शेतजमिनी खरडून गेल्या आहे. गत ६ दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात पाऊस अविश्रांत बरसत आहे. संततधार कोसळत असलेल्या पावसाने नदी- नाल्यांना पूर आला आहे.
09:43 July 14
मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज
मुंबई - मुंबईत मंगळवारपासून गुरुवारपर्यंत तीन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान मुंबईत रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
09:27 July 14
पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी केला संपर्क
मुंबई - राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. राज्यांमध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला आहे. सकाळपासून मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क सुरू आहे. यंत्रणा अलर्ट ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
08:44 July 14
चंद्रपूर पोलीस ठरले देवदूत; २२ ट्रक चालकांची पुराच्या पाण्यातून सुटका
आज पहाटे अडीच वाजता चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या पथकाने २२ ट्रक चालकांची सुटका केली. गडचांदूर-धानोरा महामार्गावर वर्धा नदीची पातळी वाढल्याने ते पुरात अडकले होते.
07:48 July 14
पालघरमध्ये सात वर्षीय मुलीला झिका व्हायरसची लागण, मुलीची प्रकृती स्थिर
पालघर-पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील झाई आश्रम शाळेतील एका सात वर्षीय वर्षीय मुलीला झिका विषाणूची लागण झाल्याचे आरोग्य तपासणीत समोर आले आहे. त्या मुलीवर डहाणू उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
07:22 July 14
पंतप्रधान नरेंद्र मोदी I2U2 शिखर परिषदेत सहभागी होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी I2U2 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या शिखर परिषदेत इस्रायलचे पंतप्रधान यायर लॅपिड, यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर बिडेन सहभागी होणार आहेत. I2U2 ची पहिली लीडर्स समिट आज 4 वाजता आयोजित केली जाणार आहे.
07:17 July 14
सोनिया गांधींविरोधातील ईडीच्या समन्सला काँग्रेस असे देणार उत्तर
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींना ईडीने समन्स बजाविले आहे. या समन्सविरोधात काँग्रेस देशभरात आंदोलन करणार आहे.
06:38 July 14
ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात-जितेंद्र आव्हाड
मुंबई -शिवसेना जेव्हा फुटली त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जबाबदार होते असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. दीपक केसरकर यांनी केलेल्या या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्तर देत "अहो केसरकर किती बोलता पवार साहबां विरुद्ध, एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
06:37 July 14
मार्गदर्शक म्हणून शरद पवार आघाडी सरकारला योग्य मार्गदर्शन करत नव्हते-माजी राज्यपाल राम नाईक
सांगली - शरद पवार हे आघाडी सरकारला योग्य मार्गदर्शन करत नव्हते,हे सिद्ध झालंय, असा आरोप भाजपाचे जेष्ठ नेते व माजी राज्यपाल राम नाईक यांनी केला आहे.औरंगाबाद नामांतरण प्रकरणी शरद पवारांनी केलेल्या विधानावर नाईक यांनी हे विधान केले आहे.
06:37 July 14
पावसामुळे ओढ्या लगतची भिंत कोसळली, नागरिकांनीच काढून दिली पाण्याला वाट
पुणे- पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे अनेक भागांमध्ये भिंत कोसळणे झाड पडणे अशा घटना घडतात पुण्यातीलच सिंहगड रस्ता येथील हिंगणे येथे खोराड वस्ती भागातील सुदत्त संकुल जवळ अविनाश विहार सोसायटीच्या जवळ ओढा वाहतो
06:36 July 14
महाबळेश्वर, वाई तालुक्यातील 233 कुटुंबांचे स्थलांतर, पुरामुळे चार गावांचा संपर्क तुटला
मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील कोयना नदीला आलेल्या पुराने चतुरबेट साकव पूल पाण्याखाली गेल्यामुळे चार गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील दहा आणि वाई तालुक्यातील दोन, अशा बारा गावातील 233 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
06:36 July 14
वसई दरड दुर्घटना: मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 6 लाखाची मदत
मुंबई - वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी आणि मनपा निधीतून हा निधी देण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
06:18 July 14
Maharashtra Live Breaking News : अमरावती शहरात दोन मजली इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही
मुंबई- पुणे जिल्ह्यात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता ( Heavy rain In Pune )आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी ( Red Alert In Pune ) करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यामध्ये 48 तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता ( Chance of heavy rain in 48 hours ) आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.