महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra breaking News : सौदीच्या ओमानमध्ये समुद्राात जतचे तिघे गेले वाहून, अभियंता पित्यासह दोन मुलांचा समावेश

Maharashtra breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Jul 13, 2022, 8:50 AM IST

Updated : Jul 13, 2022, 5:02 PM IST

17:01 July 13

सौदीच्या ओमानमध्ये समुद्राात जतचे तिघे गेले वाहून, अभियंता पित्यासह दोन मुलांचा समावेश

सांगली -सौदी अरेबिया येथील ओमानच्या समुद्रामध्ये जतमधील तिघे जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समुद्रात वाहून जात असल्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. मुळचे जत येथील असणारे अभियंता शशिकांत म्हमाणे व त्यांची दोन मुले असे तिघेजण समुद्राच्या लाटांमुळे वाहून गेल्याचा हा प्रकार ओमान येथे घडला आहे.

15:56 July 13

आर्यन खानला सत्र न्यायालयाचा दिलासा

आर्यन खानला सत्र न्यायालयाचा दिलासा

शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानला सत्र न्यायालयाचा दिलासा

ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबी कडून जप्त करण्यात आलेल्या पासपोर्ट परत मिळण्याकरिता करण्यात आलेला अर्ज सत्र न्यायालयाकडून स्वीकारला

एनसीबीला पासपोर्ट परत देण्याचे सत्र न्यायालयाचे निर्देश

एनसीबीने दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रात आर्यन खानला वगळण्यात आले होते

15:55 July 13

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहातून सायंकाळी 5 वाजता प्रतिसेकंद 1050 क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कता बाळगण्याचा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाने दिला आहे.

13:48 July 13

गोसीखुर्द धरणाचे संपूर्ण ३३ दरवाजे उघडले

अखेर आठव्या दिवशी गोसीखुर्द धरणाचे संपूर्ण 33 पैकी 33 दरवाजे उघडले गेले आहेत. 12 दरवाजे अर्ध्या मीटर ने तर 21 दरवाजे 1 मीटर ने उघडले गेले आहेत. संपूर्ण 33 दारातून 5955.85 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान खात्याने भंडारा जिल्ह्याला येल्लो अलर्ट दिला आहे. मागील 24 तासांमध्ये सात पैकी पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. नदी नाले दुथडी वरून वाहत असून तुमसर तालुक्यामध्ये सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला असून लोकांच्या घरात सुद्धा पाणी गेलेल आहे.

11:14 July 13

वसईत दरड कोसळल्याने दोन जण अडकले; 4 जणांची सुटका

वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात दरड कोसळली आहे. या दरडीखाली 6 जण अडकले होते. त्यापैकी 4 जणांची सुटका करण्यात आली आहे.

11:11 July 13

नागपूरात मुसळधार पाऊस; कपिलेश्वर मंदिराभोवती पावसाचे पाणी जमा

नागपूर जिल्ह्यातील केळवद परिसरातील कपिलेश्वर मंदिर आणि त्याच्या अवतीभवती काल झालेल्या मुसळधार पावसानंतर मंदिराच्या अवतीभवतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले आहे. तर मंदिराच्या आवारातूनही पाण्याचे प्रवाह वाहत आहेत.

11:10 July 13

नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा परिसरातील नदीला आला पूर

नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा परिसरातील नदीला पूर आला आहे. नदीच्या पात्रातील पाणी बाहेर वाहायला लागल्याने शेतात आणि परिसरात पाणीच पाणी झाले आहे. प्रशासनाने जनतेला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

10:51 July 13

पुण्यात मुसळधार पाऊस; बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद

पुणे- राज्यसह पुणे शहरात देखील मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यातील खडकवासला धरण शंभर टक्के भरल असून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असल्याने पुण्यातील बाबा भिडे पूल हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. तसेच नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

10:38 July 13

मुंबईतील सर्व लोकलला मुसळधार पावसामुळे 10 ते 15 मिनिटे उशीर

मध्य आणि पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक सर्व ट्रेन मुसळधार पावसामुळे 10 ते 15 मिनिट उशिराने धावत आहेत. तर तुरळक ठिकाणी कुठे ओव्हर हेड वायरमध्ये तांत्रीक बिघाड अश्या कारणामुळे देखील काही ट्रेन उशिराने धावत असल्याची माहिती मध्य रेल्वे मंडळाचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी दिली.

10:37 July 13

अडीच वर्षात आम्ही हिंदूत्वाची चेष्टा केली असा आरोप- आमदार सदावणकर

अडीच वर्षात आम्ही हिंदूत्वाची चेष्टा केली असा आरोप गुरूपौर्णिमा म्हणजे गुरु पूजनाचा योग. यादिवशी आम्ही शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांचे पूजन करत असत. मात्र आता ते नाहीत त्यामुळे साईबाबाच आमचे गुरु आहेत. यानिमित्तानं बाबांच्या चरणी येवून आशीर्वाद घेतल्याचे आमदार सदावणकर यांनी शिर्डीत बोलताना सांगितले.

10:10 July 13

पंचगंगा नदी इशारा पातळी गाठायला तीन फूट बाकी; तब्बल 55 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांत आज सुद्धा सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. सध्याची पाणीपातळी 35.5 फुटांवर पोहोचली असून इशारा पातळी गाठायला केवळ साडे तीन फूट बाकी आहे. जिल्ह्यात पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट आहे आणि 43 फूट धोका पातळी आहे. त्यामुळे असाच पाऊस सुरू राहिल्यावर इशारा जवळपास 12 तास लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

10:02 July 13

एकनिष्ठा हीच गुरूदक्षिणा असते- संजय राऊतांचा बंडखोरांना टोला

बाळासाहेब ठाकरे हे देशाचे आणि महाराष्ट्राचे गुरू होते. एकनिष्ठा हीच गुरूदक्षिणा असते, असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बंडखोरांना लगावला.

09:38 July 13

शिंदे गट आज एनडीएच्या बैठकीला हजर राहणार

शिंदे गट आज एनडीएच्या बैठकीला हजर राहणार आहे. शिंदे गटाचे प्रतिनिधी म्हणून दीपक केसरकर दुपारी १ वाजता एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासंदर्भात एनडीए घटक पक्षांची बैठक आयोजित केली आहे.

09:07 July 13

पैनगंगा नदीला आला पूर

नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद पैनगंगा नदीला पूर आला आहे.

09:03 July 13

अंधेरी भुयारी मार्गात शिरले पावसाचे पाणी!

शहरात मुसळधार पाऊस पडत असताना, अंधेरी भुयारी मार्ग पावसाच्या पाण्याखाली बुडाला आहे.

09:01 July 13

तीन दिवस मुंबईत ऑरेंज अलर्ट

मुसळधार पाऊस

मुंबई- मुंबईत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडला. शुक्रवार पासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर मंगळवारपासून गुरुवारपर्यंत तीन दिवस मुंबईत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान मुंबईत रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.Body:इतक्या पावसाची नोंद -
मुंबईत काल १२ जुलै सकाळी ८ ते आज १३ जुलै सकाळी ८ या २४ तासात शहर विभागात ६१.९९, पूर्व उपनगरात ४७.७२ तर पश्चिम उपनगरात ४५.९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईच्या समुद्रात सकाळी ११.४४ वाजता ४.६८ तर रात्री ११.३८ वाजता ४.०६ मीटर उंचीच्या लाटा उसळ ण्याची शक्यता आहे. या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

08:43 July 13

गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंना केले अभिवादन

गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही.... गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन... दरम्यान, शिवसेनेतील बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासह इतर नेत्यांनी टीका केली आहे.

08:43 July 13

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी साहित्य विधानभवनावर दाखल

  • राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतपेटी, मतपत्रिका, विशेष पेन आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्य मुंबई अंधेरी विमानतळावर दाखल झाले. तेथून ते विधानभवनाकडे रवाना झाले. राष्ट्रपती निवडणूकसाठी मतपेटी आणि इतर सीलबंद साहित्य मुंबई विमानतळावरुन विधानभवन मध्ये आणण्यात आले. विधानभवनातील स्ट्राँग रूममध्ये ते पूर्ण सुरक्षित व योग्य त्या खबरदारीसह ठेवण्यात आले आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक १८ जुलैला होणार आहे.

08:42 July 13

हतनूर प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ

  • जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पातील आजचा साठा खालीलप्रमाणे आहे. 18 दरवाजे पुर्ण उघडे आहेत.
पाणी पातळी 208.880 मी
एकूण साठा 163.60 दलघमी.
एकूण साठा टक्के 42.16%
विसर्ग 643 क्युसेक्स / 22708 क्युसेक्स


08:35 July 13

Maharashtra breaking News : गोसीखुर्द धरणाचे संपूर्ण ३३ दरवाजे उघडले

मुंबई- राज्यात मुसळधार पाऊस अनेक जिल्ह्यांत होत आहे. गुरूपौर्णिमा ( Guru Purnima ) कधी साजरी केली जाते, तिथीनुसार आषाढ महिन्यातील ( Ashadh month ) शुद्ध पौर्णिमेला ( Purnima ) ‘गुरूपौर्णिमा’ साजरी केली जात असते. या वर्षी ‘13 जुलै’ आज गुरूपौर्णिमा असून अनेक ठिकाणी मोठ्या श्रद्धेने गुरूपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात वेगाने हालचाली होत आहे. ( हे पेज दिवसभरात अपडेट होणार आहे )

Last Updated : Jul 13, 2022, 5:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details