महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Breaking News : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा दौप्रदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर - IMD alert for heavy rain

Maharashtra live breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Jul 12, 2022, 6:30 AM IST

Updated : Jul 12, 2022, 5:36 PM IST

17:34 July 12

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा दौप्रदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा दौप्रदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

15:36 July 12

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप करावा- पंकजा मुंडे

मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतीमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होत असल्याकारणाने राज्यभरातून ओबीसी नेते याच्या विरोधामध्ये एकवटलेले असून राज्य सरकार स्वतः याच्या विरोधात आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत त्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी यामध्ये हस्तक्षेप करून निवडणूक आयोगाशी चर्चा करावी अशी विनंती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.

14:19 July 12

आरटीई प्रवेशासाठी महाराष्ट्रात उद्या 13 जुलै 2022 अखेरचा दिवस

अद्याप राज्यात आणि मुंबईत हाजारो विद्यार्थ्यांच्या 25 टक्के अंतर्गत जागा रिक्त आहेत. आरटीई कायदा 2009 अंतर्गत 25 टक्के वंचित बालकांसाठी इयत्ता पाहिलीसाठीचे प्रवेश सक्तीने राखीव ठेवले जातात. या सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांतील बालकांना प्रवेश दिला जातो.

14:17 July 12

शिवसेनेतून आणखी दोन नेत्यांची हकालपट्टी

पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

13:18 July 12

पेंच नदीच्या काठावर असलेल्या 21 गावांना सावधानतेचा इशारा

नागपूर जिल्ह्यातील पेंच नदीच्या काठावर असलेल्या 21 गावांना जिल्हा प्रशासनाचा सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. गावांमध्ये दवंडी पिटवून नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत असून जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी असलेल्या पेंच नदीकाठच्या तब्बल 21 गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

12:18 July 12

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. शिंदे गटाकडून दीपक केसरकर दिल्लीला जाणार आहेत. येत्या 20 तारखेला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीए कडून शिंदे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्याबाबत भूमिका मांडण्यात आली आहे.

12:07 July 12

राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी नेते वायबी सेंटरमध्ये दाखल

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि पक्षाचे इतर नेते पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठकीसाठी मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले.

12:05 July 12

भीमा कोरेगाव प्रकरणी वरवरा राव यांच्या अंतरिम जामिनात वाढ

भीमा कोरेगाव प्रकरणी वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांच्या अंतरिम जामिनात वाढ झाली आहे.

11:02 July 12

मुंबई जिल्हा बँकेच्या कर्जाकरिता बनावट कर्ज प्रकरणात गुन्हा दाखल होणार, सुरेश धस अडचणीत

बीड-मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कार्यक्षेत्राबाहेर बीड जिल्ह्यात बनावट दस्तऐवज तयार करून 27 कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररीत्या वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी सहकारी संस्थांचे मुंबई विभागाचे विशेष लेखापरीक्षक (वर्ग-1 फिरते पथक) नीलेश नाईक यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

09:58 July 12

नांदेड जिल्ह्यात लेंडी नदीच्या पुरात वाहून महिलेचा मृत्यू

नांदेड- जिल्हयात मागील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पुर आला आहे. दरम्यान, देगलूर तालुक्यातील लेंडीनदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन एका महिलेचा बुडून मृत्यु झाला आहे. ही घटना १० जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता घडली आहे. सविता दत्तात्रय डाकोरे (३७) असे मृताचे नाव आहे.

09:30 July 12

नामांतर करण्यासाठी एक हजार कोटींचा खर्च कशासाठी - खासदार जलील यांचा सवाल

औरंगाबाद - शहराचे नाव बदलून काय सिद्ध होणार माहीत नाही. मात्र जनतेला याचा त्रास सोसावा लागणार आहे. तर दुसरीकडे यातून काय साध्य होणार माहीत नाही. पण त्यासाठी सरकारी तिजोरीवर एक हजार कोटींचा बोजा पडणार आहे, अशी नामांतराच्या निर्णयावर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

09:01 July 12

पुण्यातील नाना पेठमध्ये दुमजली इमारतीची भिंत कोसळली, दोघे जण जखमी

पुणे शहरातील नाना पेठ परिसरात काल रात्री उशिरा दुमजली इमारतीची भिंत कोसळली. या घटनेत २ जखमी झाले आहेत. २ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती पुणे अग्निशमन दलाने दिली आहे.

08:49 July 12

एका दिवसात कोयना धरणाच्या पाणी साठ्यात पावणे चार टीएमसीने वाढ

गेल्या चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणी साठ्यात पावणे चार टीएमसीने ( 3.76) वाढ झाली आहे. धुवांधार पावसामुळे धरणात प्रति सेकंद 43,557 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा 35.8 टीएमसी झाला आहे.

08:05 July 12

मुंबईकरांनो, पुढील ३ दिवस अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे, ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई ठाण्यासह कोकणात मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी वर्तवली आहे. त्यामुळे पुढील 3 दिवस मुंबईकराने पावसाचा अंदाज घेऊनच घराच्या बाहेर पडावे.

07:13 July 12

धाराशीव व संभाजीनगर नामांतरावर शरद पवार म्हणाले...

शहरांचे नामांतर हा महाविकास आघाडीच्या समान किमान कार्यक्रमाचा भाग नव्हता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतल्यानंतरच मला कळले, अशी प्रतिक्रिया औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

07:00 July 12

जे गेलेत त्यांच्यापैकी एकही परत येणार नाही, ते प्रयत्न उद्धव साहेबांनी करू नयेत- अनंत गीते

महाडाच्या भुताला बाटलीबंद करण्याची जशी माझी ताकद, तशी रत्नागिरी आणि दापोलीतल्या भुतांना बाटली बंद करण्याची धमक शिवसैनिकांमध्ये आहे. अशी टीका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार अनंत गीते यांनी बंडखोरांवर केली आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी कडवट हिंदुत्व विचारसरणी असलेल्या शिवसेनेच्या गळ्याला नख लावण्याच पाप तुम्ही करू नका, अशी टीकाही माजी खासदार पंतप्रधानांवर टीका केली आहे.

06:38 July 12

नाशिक शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद

नाशिक शहरातील इ.1 ली ते 12 वी च्या शाळा आज बंद राहणार आहेत. हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने शाळांना सुटी देण्यात आली आहे.

06:20 July 12

Maharashtra Breaking News : आरटीई प्रवेशासाठी महाराष्ट्रात उद्या 13 जुलै 2022 अखेरचा दिवस

मुंबई - राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाने धुमाकूळ ( Heavy rain in Maharashtra ) घातला आहे. हवामान खात्याने (IMD on Maharashtra Rain) पुढील चार दिवसांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील तीन चार दिवसापासून पाऊसाने (Gadchiroli Heavy Rains) कहर केला असून याचा सर्वाधिक फटका दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड एटापल्ली सिरोंचा आहेरी तालुक्याला बसला आहे. मुख्यालय मार्गावरील नाल्यातून पाणी ओसंडून वाहत असल्याने वाहतु ठप्प झाली तर गडचिरोलीला आज पासुन पुढील तीन दिवस हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलाआहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या ४-५ दिवसात कोकण (मुंबई ठाण्यासह),मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार‌ पाउस होणार आहे. मराठवाड्यातही पावसाचा जोर दिसणार आहे.

Last Updated : Jul 12, 2022, 5:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details