मुंबई विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक सकाळी साडेदहा वाजता विधानभवनात ( Maharashtra Monsoon session in 2022 ) पार पडणार आहे. 18 जुलै रोजी पावसाळी अधिवेशन घेण्याची तारीख ठरली असताना राज्यांमध्ये झालेल्या सत्तांतर नाट्यानंतर पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले होते. हे अधिवेशन 17 ते 25 ऑगस्ट दरम्यान होईल अशी माहिती समोर येत आहे.
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठकीत पावसाळी अधिवेशनात बाबतअधिकृत ( Legislative Working Advisory Committee ) घोषणा करण्यात येईल. 17 ते 25 ऑगस्ट अधिवेशन असेल असे जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.
अधिवेशनात अवघे सहा दिवस कामकाजएकनाथ शिंदे सरकारचे पहिले अधिवेशन असणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट असे पावसाळी अधिवेशन असले तरी या नऊ दिवसाच्या कालावधीत केवळ सहा दिवसात कामकाज होणार आहे. अधिवेशनाच्या काळात 19 ऑगस्टला दहीहंडीची सार्वजनिक सुट्टी तर 20 आणि 21 ऑगस्टला शनिवार आणि रविवार येत असल्याने सलग तीन दिवस सुट्टी असणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 17 ऑगस्टला राज्यपालांचे अभिभाषण होईल. 18 ऑगस्टला शासकीय कामकाज केले जाईल. 22 आणि 23 ऑगस्ट रोजी पुरवणी मागणी पटलावर ठेवले जातील. तुमच्या गावातला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. तर 29 ऑगस्टला पुन्हा एकदा कामकाज पार पाडलं जाईल. असे एकूण सहा दिवस पावसाळी अधिवेशनात कामकाज चालणार आहे.