महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MLC Result LIVE Updates : एकनाथ खडसे, दरेकर, रामराजे निंबाळकर विजयी; राम शिंदेंनेही उधळला गुलाल; वाचा, दिवसभरातील अपडेट्स - undefined

Maharashtra Legislative Council Election voting 2022 live update
Maharashtra Legislative Council Election voting 2022 live update

By

Published : Jun 20, 2022, 8:57 AM IST

Updated : Jun 20, 2022, 10:51 PM IST

22:46 June 20

एकनाथ खडसे, दरेकर, रामराजे निंबाळकर विजयी; राम शिंदेंचाही विजयी

एकनाथ खडसे, दरेकर, रामराजे निंबाळकर विजयी; राम शिंदेंचाही विजयी

22:25 June 20

एका जागेवरून गोंधळ सुरू, कार्यकर्त्यांची मात्र घोषणाबाजी

दहा जागांपैकी 9 जागांचा निकाल लागला असून, एका जागेचा निकाल अद्याप येणे बाकी आहे.

21:29 June 20

विजयी उमेदवार

सचिन अहिर आणि आमशा पाडवी विजयी

रामराजे नाईक निंबाळकर आणि उमा खापरे विजयी

21:14 June 20

एकनाथ खडसे आणि राम शिंदे विजयी

एकनाथ खडसे आणि राम शिंदे विजयी

उमा खपरेच्या मतासाठी भाजप जाणार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे

मत वैध असल्याचा भाजपचा दावा

एकनाथ खडसे आणि राम शिंदे विजयी

दोघांनी 26 मतांचा कोटा पूर्ण केला

20:55 June 20

उमा खापरे यांच्या पहिल्या पसंतीच्या मतावर महाविकास आघाडीकडून आक्षेप

आता उमा खापरे यांच्या पहिल्या पसंतीच्या मतावर महाविकास आघाडीकडून आक्षेप

ते मतही बाजूला ठेवले

अजूनपर्यंत दोन मतांवर आक्षेप

रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मतावरही घेण्यात आला होता आक्षेप

20:10 June 20

महाविकास आघाडीला झटका; रामराजे नाईक निंबाळकर यांचे एक मत बाद

रामराजे निंबाळकर यांचे एक मत बाद

वैध मत ठरवताना एक मत बाद

महाविकास आघाडीला झटका

19:59 June 20

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

आमचे सहाच्या सहा उमेदवार निवडून येतील यात शंका नाही. थोड्याच अवधीत निकाल स्पष्ट होईल राज्यसभेच्या निवडणुकीत आमच्याकडून काही चुका झाल्या होत्या, पण त्या आता झालेल्या नाहीत. एखाद्या आमदाराची तब्येत बरी नसताना, इतका ताप असताना त्याला अशा पद्धतीने मतदानासाठी घेऊन येणे हे कितपत योग्य आहे.

19:37 June 20

सर्व पक्षांची सर्व मते वैध

सर्व पक्षांची सर्व मते वैध ठरली आहे. सध्या मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, विधानभवनाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.

19:07 June 20

विधानपरिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

विधानपरिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

दोन तासानंतर मतमोजणीला सुरवात

काँग्रेसने घेतला होता मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानाला आक्षेप

याबाबत केली होती निवडणूक आयोगात तक्रार

18:54 June 20

भाजपचे दोन मते रद्द करण्याची काँग्रेसची मागणी

भाजपच्या दोन आमदारांच्या मतांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी निवडणूक नियम 1961 च्या नियम 40अ चे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने त्यांची मते रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

17:54 June 20

काँग्रेसच्या आक्षेपामुळे मतमोजणीला विलंब; भाजपच्या दोन आमदारांनी गुप्तता भंग केल्याचा आरोप

काँग्रेसच्या आक्षेपामुळे मतमोजणीला विलंब; भाजपच्या दोन आमदारांनी गुप्तता भंग केल्याचा आरोप

काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपामुळे अद्याप मतमोजणीला सुरुवात नाही

जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप

काँग्रेसकडून मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार

5 वाजता सुरू होणार होती मतमोजणी

17:08 June 20

थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

मुंबई - राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. 285 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. थोड्याच वेळात या मतमोजणीला सुरुवात होणार असून कोणाला परिषदेची लॉटरी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

16:18 June 20

भाजपच्या दोन मतांवर काँग्रेसकडून आक्षेप; गुप्तता भंग केल्याचा आरोप

भाजपच्या दोन मतांवर काँग्रेसकडून आक्षेप; गुप्तता भंग केल्याचा आरोप

लक्ष्मण जगताप यांनी दुसऱ्याच्या मदतीने मतपेटीत मत टाकल्याचा आरोप

जगताप यांनी मतदान करताना गुप्तता भंग केल्याचा आरोप

लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी गुप्तता भंग केल्याचा आरोप

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली तक्रार

15:38 June 20

नवाब मलिक, अनिल देशमुखांचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला; मतदान करता येणार नाहीच

नवाब मलिक, अनिल देशमुखांचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला; मतदान करता येणार नाहीच

15:08 June 20

महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून येतील - एकनाथ शिंदे

सर्वाधिक जास्त मते शिवसेनेकडे आहेत आणि महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीची ठरली होती त्यानुसार कोटा दिला आणि तो सध्या मतपेटीत आहे. तो इथे सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया

14:50 June 20

लक्ष्मण जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क

भाजपचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे आजारी असून सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज विधानभवनात पोहचले. पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथून ॲम्बुलन्समधून त्यांनी थेट विधान भवन गाठले. वास्तविक मागील १० तारखेला झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा ते ॲम्बुलन्समधून विधान भवनात मतदानासाठी आले होते. आजही सकाळी साडेदहा वाजता पुण्याहून ते मतदानासाठी निघाले व दुपारी सव्वा दोन वाजता ते विधान भवनात दाखल झाले.

13:52 June 20

काँग्रेसमध्ये कोणीही नाराज नाही, अपक्षांची मते आम्हाला मिळणार - नाना पटोले

मुंबई -काँग्रेसमध्ये कोणीही नाराज नाही. आम्ही अपक्ष आणि छोट्या पक्षांसोबत असल्याने त्यांची मते आम्हाला मिळणार आहेत. अग्निबाणांचा अतिविश्वास त्यांना घडणार आहे. सर्व उमेदवार निवडून येतील. काँग्रेसचा दुसऱ्या उमेदवारालाही मते मिळतील. आमदारांची नाराजी त्यांचे पक्ष दूर करत आहेत. यावेळेस कोणताही दगाफटका होणार नाही, असा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विश्वास व्यक्त केला.

13:51 June 20

'या' नेत्यांचे मतदान अद्याप बाकी

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि माणिकराव कोकाटे, तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुनील प्रभू, प्रताप सरनाईक आणि उदय सामंत याचे मतदान अद्याप बाकी.

13:14 June 20

काँग्रेसच्या 44 आमदारांचे मतदान पूर्ण

काँग्रेसच्या 44 आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. अशात काँग्रेसचे प्रमुख नेते पक्ष कार्यालयात मतांची बेरीज जुळवताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे दोन्ही उमेदवार जिंकून यावेत यासाठी आपली जबाबदारी योग्य पार पडली आहे का, याची चर्चा काँग्रेस नेते करत आहेत. दरम्यान मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार विजयी होतील असा विश्वास काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

12:53 June 20

शिवसेनेचा एक उमेदवार 100 टक्के पडणार - रवी राणा

शिवसेनेचा एक उमेदवार 100 टक्के पडणार.

12:45 June 20

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला.

12:29 June 20

देवेंद्र फडणवीस यांनी आमदार मुक्ता टिळक यांचे केले स्वागत

विधान परिषद निवडणुकीत आपले बहूमुल्य मत देण्यासाठी कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढा देत असतानाही विधानभवनात पोहचलेल्या भाजपच्या कसबा पेठ येथील आमदार मुक्ता टिळक यांचे स्वागत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे उमेदवार राम शिंदे, प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित होते.

12:12 June 20

12 वाजेपर्यंत 203 आमदारांनी केले मतदान

12 वाजेपर्यंत 203 आमदारांनी केले मतदान.

11:58 June 20

देवेंद्र फडणवीसांना प्रसाद देणार - अपक्ष आमदार देवेंद्र भुयार

राज्यसभेच्या पद्धतीने विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे. पक्षाने ठरवल्यानुसार मतदान केले. अपक्ष अमदारांवर अविश्वास दाखवला होता. हनुमाना प्रमाणे छाती फाडून दाखवू शकत नव्हतो, म्हणून वक्तव्य केले होते, देवेंद्र फडणवीसना प्रसाद देणार, असे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार म्हणाले.

11:37 June 20

11 वाजेपर्यंत 141 आमदारांचे मतदान

11 वाजेपर्यंत 141 आमदारांचे मतदान.

11:36 June 20

भाजपचे आजारी आमदार जगताप, टिळक विधान भवनात दाखल.

भाजपचे आजारी आमदार जगताप, टिळक विधान भवनात दाखल.

11:02 June 20

कोणीही नाराज नाहीत, नॉट रीचेबल नाहीत - छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदान सुरू आहे, आघाडी सरकारचे सर्व आमदार मतदान करणार आहेत. कोणीही नाराज नाहीत, नॉट रीचेबल नाहीत, छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण.

10:52 June 20

'ते' आमदार अद्यापही नॉट रिचेबल

दिलीप मोहीते पाटील, अण्णा बनसोडे अद्यापही नॉट रिचेबल.

10:51 June 20

भाजपच्या 81 आमदारांचं मतदान पूर्ण

भाजपच्या 81 आमदारांचं मतदान पूर्ण.

10:51 June 20

रोहीत पवार, वळसे पाटील, आदिती तटकरेंनी केले मतदान.

रोहीत पवार, वळसे पाटील, आदिती तटकरेंनी केले मतदान.

10:15 June 20

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल.

10:11 June 20

सहाही उमेदवार बहुमताने विजयी होणार, विरोधकांचा गर्व उतरणार - नाना पटोले

आज विधान परिषदेची निवडणूक आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी ( Nana Patole on maharashtra vidhan parishad election ) सर्वस्व पणाला लावले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव आला होता. त्यानंतर आता विधान परिषदेतही ( maharashtra vidhan parishad election ) असेच होणार का? यावर चर्चा रंगली होती. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार विजयी ( Maha vikas Aghadi candidate ) होती आणि विरोधकांचा गर्व उतरेल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.

09:56 June 20

आमच्या पक्षातून गेलेले आमचे राहिलेले नाहीत, खडसेंना हरिभाऊ बागडेंचा टोला

एकूण मतदानापैकी पाचवा नंबर होता. मी पहिले मतदान केलेले नाही. पाचही उमदेवार निवडून येतील. आमच्या पक्षातून गेलेले आमचे राहिलेले नाहीत, खडसेंना भाजप नेते हरिभाऊ बागडे यांचा टोला.

09:54 June 20

आघाडीतील खदखद आज दिसेल, भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील - राम कदम

आघाडीचे तीन पक्ष, त्यातील आमदारांमधील नाराजी, खदखद असंतोष, आजच्या निवडणकुीत दिसेल. भाजपचे सगळे आमदार निवडून येतील. भाजपसोबत खऱ्या अर्थाने अपक्ष आहेत, त्याचबरोबर आघाडीमधील काही आमदार आहेत. नाईलाजाने ते मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याने ते अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत, असे भाजप नेते राम कदम म्हणाले.

09:48 June 20

शिवसेनेची बस अडकली वाहतूक कोंडीत

शिवसेनेची बस अडकली वाहतूक कोंडीत. आदित्य ठाकरेंही अडकले.

09:41 June 20

राज्यसभेने खूप काही शिकवले, यावेळी एकेका मतांची काळजी घेतली आहे - रोहित पवार

मुंबई -राज्यसभेने खूप काही शिकवले. विरोधी पक्ष कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो. आमदारांवर दबाव आणू शकतो. यावेळी आघाडीने सर्व काळजी घेतली आहे. गेल्यावेळी एक मत बाद झाले म्हणून सगळे बदलले. यावेळी एकेका मतांची काळजी घेतली आहे. भाजप अतिआत्मविश्वासाने बोलत आहे. त्यांच्याकडे संख्याबळ नाही. भाजप वातावरण निर्माण करते ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे, अति आत्मविश्वास नाही. थोडी नाराजी असते पण बहुतांश ठिकाणी त्यांनी आघाडीलाच साथ दिली आहे. संवादातून नाराजी संपली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली.

09:39 June 20

राजकारण खूप खालच्या दर्जाचे केले जात आहे - भाई जगताप

गणित सगळी आघाडीच्या बाजूने. संध्याकाळी निकाल समोर येईल. ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. एकमेकांचा आदर ठेवला जायचा. राजकारण खूप खालच्या दर्जाचे केले जात आहे. निवडणून येणारच, असा विश्वास विधान परिषदेचे उमेदवार तथा काँग्रेस नेते भाई जगताप यांनी व्यक्त केला.

09:15 June 20

राष्ट्रवादीचे तीन आमदार नॉट रिचेबल, मतांचा कोटा ठरविण्याकरिता काँग्रेसची होणार बैठक

मुंबई- ऐन विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे तीन आमदार नॉट रिचेबल झाल्याने महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. दुसरीकडे रणनीती ठरविण्याकरिता काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. मतांचा कोटा ठरविण्याकरिता काँग्रेसची बैठक होणार आहे.

09:06 June 20

10 जागा, 11 उमेदवार, कुणाचा होणार विजय?

विधान परिषदेच्या १० जागांसाठी थोड्याच वेळात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ११ उमेदवार रिंगणात असून गुप्त मतदान प्रक्रिया असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. त्यामुळे दगाफटका होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्षांचे यामुळे धाबे दणाणले आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi In MLC Election ) आणि विरोधीपक्ष भाजपाची ( BJP In MLC ) उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. मात्र पाडापाडीचे राजकारण रंगणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपाच्या प्रसाद लाड यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

08:48 June 20

भाजपचा गर्व खाली उतरण्याचा आजचा दिवस - नाना पटोले

भाजपचा गर्व खाली उतरण्याचा आजचा दिवस. महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक रणनिती आखली आहे, असे नाना पटोले म्हणाले.

08:47 June 20

उपमुख्यमंत्री अजित पवार विधानभवनात दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री यशोमती ठाकूर, भाजप आमदार आशिष शेलार विधानभवनात पोहचले

08:19 June 20

Maharashtra Legislative Council Election voting 2022 live update

भाजपचे उमेदवार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड विधान भवनात पोहचले.

Last Updated : Jun 20, 2022, 10:51 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details