महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Breaking News Live : राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे घेतले दर्शन - 3 सप्टेंबर 2022 बातम्या

breaking news
फाईल फोटो

By

Published : Sep 3, 2022, 6:49 AM IST

Updated : Sep 3, 2022, 1:13 PM IST

13:11 September 03

बिल गेट्स हाजीर हो..; मुंबई उच्च न्यायालयाने धाडले समन्स

मुंबई :आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी कोविशील्ड व्हॅक्सिन कंपनीला दोषी ठरवणाऱ्या एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने Bombay High Court सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया Serum Institute of India आणि इतरांकडून याबाबत उत्तर मागितले आहे. या प्रकरणी 1 हजार कोटींची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. याचिकाकर्ते दिलीप लुणावत यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स Microsoft founder Bill Gates, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार Government of Maharashtra आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया Drug Controller General of India यांनाही या प्रकरणात पक्षकार बनवले आहे.

11:22 September 03

राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे घेतले दर्शन

मुंबई -राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक येथे जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे.

10:34 September 03

अजित डोवाल यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

मुंबई -राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. राजभवनात ही सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यानचे फोटोही समोर आलेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अजित डोवाल यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. मात्र चर्चेत नेमकं काय घडलं, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

10:06 September 03

विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली १२ नावांची यादी रद्द करा. मुख्यमंत्री शिंदे यांचे राज्यपालांना पत्र

मुंबई -उद्धव ठाकरे सरकार अस्तित्वात असताना त्यांनी राज्यपालांकडे विधान परिषदेसाठी १२ आमदारांची यादी पाठवली होती. परंतु दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही त्या यादीवर राज्यपालांनी स्वाक्षरी न केल्याने हा वाद शिगेला पोचला होता. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा राज्यपालांना टोला लगावला होता. परंतु आता सरकारच बदलले असल्याकारणाने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पत्र लिहून महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली यादी रद्द करण्याची विनंती केली आहे.

10:06 September 03

विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली १२ नावांची यादी रद्द करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यपालांना पत्र

मुंबई -उद्धव ठाकरे सरकार अस्तित्वात असताना त्यांनी राज्यपालांकडे विधान परिषदेसाठी १२ आमदारांची यादी पाठवली होती. परंतु दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही त्या यादीवर राज्यपालांनी स्वाक्षरी न केल्याने हा वाद शिगेला पोचला होता. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा राज्यपालांना टोला लगावला होता. परंतु आता सरकारच बदलले असल्याकारणाने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पत्र लिहून महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली यादी रद्द करण्याची विनंती केली आहे.

09:40 September 03

अकोल्यात शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची हत्या

अकोला - अकोल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुख याची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर मृतदेह तलावात फेकून देण्यात आला. भागवत अजाबराव देशमुख (वय २८, राहणार कौलखेड, अकोला.) असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, हत्या करून भागवतचा मृतदेह तलावाच्या पाण्यात राहल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. त्यामुळ पोलिसांकडून त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आले. याप्रकरणी पातुर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

09:24 September 03

लस घेतल्यानंतर झालेल्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे भारत सरकार, सीरम इन्स्टिट्यूटला नोटीस

मुंबई -दिलीप लुणावत नावाच्या एका व्यक्तीने कोविशील्ड घेतल्यानंतर त्यांची मुलगी डॉ स्नेहल लुणावतच्या मृत्यूसाठी 1000 कोटी रुपयांची भरपाई मागणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने भारत सरकार, सीरम इन्स्टिट्यूट, बिल गेट्स, एम्सचे संचालक, डीसीजीआय प्रमुख आणि इतरांना नोटीस बजावली आहे.

08:45 September 03

वडिलांनी विष पाजून दोन मुलांचा गळा आवळला; बोर्डा गावातील घटनेने खळबळ

चंद्रपूर : जन्मदात्या वडिलाने आपल्या दोन चिमुकल्या मुलांना आधी विष पाजले. त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी (ता. २) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वरोरा शहरालगतच्या बोर्डा गावात घडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, फरार वडिलाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. संजय श्रीराम कांबळे (वय ४०) असे वडिलाचे, तर सुमित (वय ७), मिस्टी (वय ३) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत.

08:00 September 03

ठाण्यातील राबोडी परिसरातील कृत्रिम तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 7 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

ठाणे - महापालिका प्रशासनाकडून कोट्यवदी रुपये खर्चून कृत्रिम तलाव बांधण्यात आले आहे. मात्र कोणतीही सुरक्षेची उपाय योजना न केल्यामुळे एका 7 वर्षीय बालकाचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला आहे. सदरची घटना राबोडी परिसरातील आंबेघोसाळे तलाव येथे सायंकाळी 8 च्या सुमारास घडली.

07:35 September 03

मुंब्र्यात दरड कोसळून महिलेचा मृत्यू; परिसरातील १४ कुटूंबियांना इतरत्र हलवले

ठाण्यातील मुंब्रा परिसरात असलेल्या डोंगराळ भागात दरड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेमध्ये दोन घरांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. मुंब्रा गावदेवी, लाल किल्ला ढाबा जवळ, मुंब्रा बायपास रोडच्या बाजूच्या डोंगरावरील ही दगड कोसळली, या भल्या मोठ्या दगडामुळे मुंब्रा बायपास नजीक असलेल्या साईकृपा आणि गजराज सोसायटी या दोन चाळीतील काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी नुकसान झालेल्या घरात झोपलेल्या एका महिलेचा दुर्देवी मुत्यू झाला आहे. कविता वानपसरे असे या ३५ वर्षीय मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून याच भागात असलेल्या १४ कुटूंबियांना इतरत्र हलवण्यात आले आहे.

07:13 September 03

नितीशकुमारांना धक्का; मणिपूरमधील JDU चे पाच आमदार भाजपमध्ये दाखल

इंफाळ : बिहारमध्ये एकीकडे नितीशकुमार यांनी भाजपसोबत राजकीय खेळी करत महाआघाडीसोबत सरकार स्थापन केले, तर दुसरीकडे मणिपूरमध्ये जेडीयूलाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या 6 पैकी पाच आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. रात्री उशिरा या राजकीय घडामोडीमुळे मणिपूर आणि बिहार या दोन्ही ठिकाणी राजकीय उलथापालथ झाली आहे. एकीकडे जेडीयू याला असंवैधानिक म्हणत आहे, तर भाजप त्या आमदारांचे खुल्या मनाने स्वागत करत आहे.

06:35 September 03

maharashtra breaking news

सातारा -विहिरीजवळच्या शेतात फुले तोडण्यासाठी गेल्यानंतर वीजेचा शॉक लागून विहिरीत पडल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तासवडे (ता. कराड) गावात शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत दीर, भावजयीसह एका मुलाचा मृत्यू झाला आहे. हिंदुराव मारुती शिंदे (वय ५८), सीमा सदाशिव शिंदे (वय ४८) आणि शुभम सदाशिव शिंदे (वय २३), अशी मृतांची नावे असून दोघेजण या घटनेतून बचावले आहेत.

Last Updated : Sep 3, 2022, 1:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details