महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'तांडव'मधील कलाकारांची जीभ छाटणाऱ्यास एक कोटींचे बक्षीस - महाराष्ट्र करणी सेना

'तांडव' या वेबसीरिजमधून हिंदू देवतांचा अपमान झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र करणी सेनेने या सीरिजमधील कलाकारांची जीभ छाटणाऱ्यास 1 कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

'तांडव'मधील कलाकारांची जीभ छाटणाऱ्यास एक कोटींचे बक्षीस - महाराष्ट्र करणी सेना
'तांडव'मधील कलाकारांची जीभ छाटणाऱ्यास एक कोटींचे बक्षीस - महाराष्ट्र करणी सेना

By

Published : Jan 25, 2021, 12:13 PM IST

मुंबई - ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झालेल्या 'तांडव' वेबसीरिजप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर यासंदर्भात या वेबसीरिजच्या दिग्दर्शक, निर्माता व संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र करणी सेनेने आता या वादात उडी घेतली आहे. 'तांडव'मध्ये हिंदू देवी देवतांचा अपमान करणाऱ्या कलाकारांची जीभ छाटून आणेल त्यास महाराष्ट्र करणी सेनेकडून 1 कोटी रुपये दिले जातील असं महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंग सेंगर यांनी म्हटले आहे.

'तांडव'मधील कलाकारांची जीभ छाटणाऱ्यास एक कोटींचे बक्षीस - महाराष्ट्र करणी सेना
वेब सिरीज निर्मात्यांचा माफीनामादरम्यान, 'तांडव' वेब सीरिजमध्ये हिंदू धर्माविषयी भावना दुखविण्याचा आरोप करत भाजप नेते राम कदम यांनी आंदोलनाचा इशारा देत या संदर्भात पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली होती. उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल केल्यानंतर तपासासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक मुंबईत दाखल होण्याअगोदरच 'तांडव' वेबसीरिज बनविणाऱ्यांकडून यासंदर्भात बिनशर्त माफी मागण्यात आलेली आहे. 'तांडव' निर्मात्यांकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणण्यात आले आहे की, ही वेबसीरिज पूर्णपणे काल्पनिक असून कुठल्याही जिवंत व्यक्ती किंवा घटनेच्या संदर्भात याचा संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'तांडव' निर्मात्यांकडून कुठलीही व्यक्ती, जात, समुदाय किंवा धार्मिक भावनांना दुखावण्याचा कुठलाही हेतू नसल्याचं निर्मात्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details