महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'वडाळा पोलीस कोठडी मृत्यू' प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल - mumbai crime

पोलीस कोठडीत मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती अॅड. अरविंद तिवारी यांनी दिली. या संदर्भात अॅड.अरविंद तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहितार्थ याचिका दाखल केली आहे.

अॅड.अरविंद तिवारी, याचिकाकर्ते

By

Published : Nov 1, 2019, 5:24 PM IST

Updated : Nov 1, 2019, 8:05 PM IST

मुंबई - वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याच्या कोठडीत विजय सिंग या 26 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला होता. मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीत विजयाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. यानंतर ५ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

पोलीस कोठडीत मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती अॅड. अरविंद तिवारी यांनी दिली.

पोलीस कोठडीत मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती अॅड.अरविंद तिवारी यांनी दिली. या संदर्भात अॅड.अरविंद तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहितार्थ याचिका दाखल केली आहे. तसेच निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यामध्ये अंतर्भूत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टी दरम्यान न्यायमूर्ती तातडे यांच्या खंडपीठासमोर संबंधित याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर न्यायमूर्ती तातडे यांनी ही याचिका पुढील सुनावणीसाठी मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग यांच्या खंडपीठासमोर पाठवली असून, येत्या 4 नोव्हेंबरला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

Last Updated : Nov 1, 2019, 8:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details