महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra HSC 2022 Result : आज बारावीचा ऑनलाइन निकाल, 'इथे' पाहा तुमचे गुणपत्रक - Minister Varsha Gaikwad

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा ( Exam Fever ) निकाल ( Maharashtra HSC 2022 Result ) मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार बुधवारी ( दि 8 जून) रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Minister Varsha Gaikwad ) यांनी दिली आहे.

वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड

By

Published : Jun 7, 2022, 4:27 PM IST

Updated : Jun 8, 2022, 7:16 AM IST

मुंबई -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल ( Maharashtra HSC 2022 Result ) मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार बुधवारी ( दि. 8 जून) रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Minister Varsha Gaikwad ) यांनी दिली आहे.

माहिती देताना मंत्री वर्षा गायकवाड

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय शिक्षण मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेला ( Exam Fever ) सुमारे 14 लाख 85 हजार विद्यार्थी सामोरे गेले होते. या परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार 8 जून रोजी दुपारी 1वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

तसेच बारावी परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थ्याना पाहता येणार आहे. www.mahresult.nic.inया संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.inया संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

कुठे पाहणार बारावीचा निकाल ? -विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल www.mahresult.nic.in, www.hscresult.mkcl.orgआणि www.mahahsscboard.inया संकेस्थळावर पाहता येणार आहे.

गुण पडताळणीही ऑनलाइन -गुण पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ( http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुण पडताळणीसाठी 10 जून ते 20 जून, 2022 पर्यंत व छायाप्रतीसाठी 10 जून ते 29 जून, 2022 पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येईल.

हेही वाचा -Rajya Sabha Election 2022 : 'या' कारणांमुळे राज्यसभेची सहावी जागा महत्त्वाची; वाचा, सविस्तर...

Last Updated : Jun 8, 2022, 7:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details