मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात वाढत आहे. तसेच कोरोना बाधितांचा आकडा देखील वाढला असून सध्या 135 कोरोना बाधित रुग्ण असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. तसेच काळाची गरज लक्षात घेता नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन टोपेंनी केले. राज्यभरातील खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने आणि मेडिकल प्रॅक्टिस सुरू ठेवण्याची विनंती टोपे यांनी केली आहे. नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे. 'मीच माझा रक्षक', अशा ब्रीद वाक्याचा उच्चार यावेळी राजेश टोपे यांनी केला.
काय म्हणाले राजेश टोपे ?
- जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या महत्वाच्या सूचना दिल्या आहेत
- काही डॉक्टरांनी भीतीपोटी खासगी दवाखाने बंद केले आहे, ते चुकीचे आहे
- सर्व डॉक्टरांना विनंती आहे की, त्यांनी मेडिकल प्रॅक्टीस सुरू ठेवावी
- गाव, वाड्या-वस्त्यांवरील डॉक्टरांना कोणताही त्रास होणार नाही, तुम्ही रुग्णालये सुरू ठेवावीत
- कोरोनाशिवाय इतरही आजार आहेत, त्यामुळे सर्व दवाखाने सुरू ठेवावेत
- ओपीडी बंद, इमर्जन्सी सर्व्हिसेस बंद आहेत. अशा वेळी दवाखाने सुरू असणे गरजेचे
- सर्व राज्यभरातील खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने आणि हॉस्पिटल सुरू ठेवावेत, नागरिकांना उपचार द्यावेत
- राज्याची रक्तपेढी आहे. मात्र, सात ते आठ दिवसांपुरते रक्त शिल्लक आहे.
- वेळेची आणि काळाची गरज लक्षात घेता रक्तदान महत्वाचे
- रक्त फक्त कोरोनासाठी लागते असे नाही; ते अनेक आजारांसाठी लागते.
- रक्तदान करण्याचे टोपेंचे आव्हान
- आयसोलेशनचे वॉर्ड आहेत, तिथे एन-95 मास्क वापरण्याचा प्रोटोकॉल
- त्या व्यतिरीक्त साधे मास्क घातले तरी चालेल, त्यामुळे गैरसमज ठेवून घाबरू नका