मुंबई : भाजपच्या मागणीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( governor bhagat singh koshyari ) यांनी महाविकास आघाडी सरकारला उद्याच विश्वासदर्शक चाचणीला ( MVA Government Floor Test ) सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. याविरोधात महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली ( MVA Govt In SC ) आहे. संध्याकाळी 5 वाजता याचिकेवर सुनावणी होणार आहे.
याबाबत बोलताना काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण ( Congress Leader Prithviraj Chavan ) म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. त्यानुसार उद्याच विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. मात्र याविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधिमंडळ सचिवांना गुरुवारी सकाळी ११ वाजता शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारची चाचणी घेण्यास सांगितले आहे. पीटीआयशी बोलताना चव्हाण म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलैपर्यंत या प्रकरणावर स्थिती कायम ठेवली आहे. त्यानुसार राज्य विधानसभेच्या उपसभापतींसमोर अपात्रतेची कार्यवाही 11 जुलैपर्यंत स्थगित ठेवण्याच्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देत होते.