मुंबई : गेल्या काही काळापासून राज्यात आमदार निधीमध्ये वाढ करण्याची मागणी होत होती. या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) यांनी सकारात्मक निर्णय घेत आमदार निधी ४ कोटीवरून पाच कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला ( MLA Fund Increased In Maharashtra ) आहे.
MLA Fund Increased In Maharashtra: आमदारांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा.. आमदार निधीत घसघशीत वाढ - आमदार विकास निधीमध्ये १ कोटी रुपयांची वाढ
राज्यभरातील आमदारांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) यांनी मोठी घोषणा केली आहे. आमदार विकास निधीमध्ये १ कोटी रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली ( MLA Fund Increased In Maharashtra ) आहे. त्यामुळे आमदारांना आता ५ कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी मिळणार आहे.
अजित पवार
विधानसभेत बोलताना राज्यभरातील आमदारांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही महत्वाची घोषणा केली आहे. आमदार विकास निधीमध्ये १ कोटी रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आमदारांना आता ५ कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी मिळणार आहे.
निधी कमी मिळत असल्याने आमदारांकडून सातत्याने हा आमदार निधी वाढविण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात येत होती. त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.