महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharastra Political Crisis : बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी राज्यपाल कोश्यारी मैदानात; पोलीस महासंचालकांना पत्र

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहित ( Bhagat Singh Koshyari writes state DGP ) बंडखोर आमदारांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari

By

Published : Jun 26, 2022, 10:56 PM IST

मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्यात मोठं राजकीय नाट्य सुरु आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी 40 ते 50 आमदारांसह बंड केलं आहे. त्या आमदारांच्या कुटुंबीयांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहलं आहे. त्यामध्ये त्यांनी आमदारांना सुरक्षा देण्याची मागणी केली ( Bhagat Singh Koshyari writes state DGP ) आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आज ( 26 जून ) ते बरे झाले आहेत. त्यानंतर ते राज्यातील राजकीय नाट्यात सक्रिय झाले आहेत. शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या पोस्टर फाडले जात आहे. तसेच, काही ठिकाणी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड आणि घराबाहेर निर्दशने करण्यात येत आहेत. त्याच प्रकरणी भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र लिहले आहे. त्यात बंडखोर आमदारांना आणि त्यांच्या कुटुबीयांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे पोलीस महासंचालकांना पत्र

"शांतता भंग करणाऱ्यांवर..." - दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत म्हटले की, “कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सतर्क आणि सज्ज आहेत. राज्याच्या विविध भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल," असेही गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details