महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड.. वेतनासाठी 112 कोटींचा मिळणार निधी - राज्यातील एस टी कामगार संपावर

महाराष्ट्रातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून 112 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

ST employees strike
ST employees strike

By

Published : Oct 27, 2021, 2:00 AM IST

मुंबई -महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले. त्यानुसार आज तातडीने निधी वितरीत करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड -

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना संकट काळात एसटी कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा बजावली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार ठामपणे उभे आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या परिवहन महामंडळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत झाले पाहिजे, अशी या सरकारची भूमिका आहे. कोरोना संकटकाळात टाळेबंदीची परिस्थिती निर्माण झाल्याने एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाला. प्रवासी संख्या कमी झाली. त्यामुळे परिवहन महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परिणामी पगारासाठी निधीची कमतरता निर्माण झाली. या कठीण परिस्थितीचा विचार करता परिवहन महामंडळाला उपमुख्यमंत्र्यांनी 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश दिले व त्याची तात्काळ अंमलबजावणी झाली. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

हे ही वाचा -गृह राज्य मंत्र्यांनी अचानक पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलिसांची घेतली झाडाझडती


एसटी कर्मचारी बेमुदत उपोषणावर बसणार -

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर -नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी देण्यासंदर्भात एसटी प्रशासनाकडे एसटी महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने मागणी केली आहे. मात्र, ही मागणी मान्य न झाल्यामुळे राज्यभर एसटी कर्मचारी बेमुदत उपोषणावर बसणार आहेत. यामुळे राज्यातील प्रवाशांना मोठ्या समस्यांना समोरे जावे लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details