मुंबई - ठाणे खाडी क्षेत्राला ( Thane Bay Area ) 'रामसर' स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी राज्याच्या कांदळवन कक्षाने सादर केलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. आता हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी केंद्र सरकारला पाठविण्यात आल्याने रामसर स्थळाचा दर्जा मिळण्याचा मार्ग ( Maharashtra Government Proposal To Central Government ) मोकळा झाला आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aaditya Thackeray ) यांच्या अध्यक्षतेखाली 9 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या राज्य पाणथळ प्राधिकरणाच्या चौथ्या बैठकीत यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. रामसर दर्जा मिळाल्यास पक्षी निरिक्षणासाठी देश विदेशातून पर्यटक आकर्षित होतील. तसेच पर्यावरण व पर्यटन वाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. यासोबत पाणथळ जागेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचून त्याच्या संरक्षणास आणि संवर्धनास अधिक गती मिळतांना जागतिक पर्यटन नकाशावर देखील याची नोंद होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले ( Cm Thackeray On Thane Bay Area ) आहे.
ठाणे खाडी