महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rajendra Shingne : कोरोनाच्या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज - राजेंद्र शिंगणे - कोरोनाच्या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज राजेंद्र शिंगणे

राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले ( Maharashtra Corona Cases Increased ) आहेत. त्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बाबीची सज्जता झाली आहे, असा दावा मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे ( Minister Rajendra Shingane On Corona Wave ) यांनी केला आहे.

Rajendra Shingne
Rajendra Shingne

By

Published : May 30, 2022, 9:18 PM IST

मुंबई -राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले ( Maharashtra Corona Cases Increased ) आहेत. त्यामुळे राज्य सरकार आता दक्ष झाले असून, अन्न आणि औषध प्रशासन खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बाबीची सज्जता झाली आहे, असा दावा मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे ( Minister Rajendra Shingane On Corona Wave ) यांनी केला आहे.

राजेंद्र शिंगणे यांच्याशी बोलताना प्रतिनिधी

राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल केल्यानंतर आता सर्व व्यवहार सुरळीत होत असताना अचानक पुन्हा रुग्णांत वाढ झाली आहे. कोरोना रुग्ण संख्या अद्यापही लक्षणीय वाढ नसली, तरीही काळजी घेणे आणि सजग राहणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यानिमित्ताने अन्न आणि औषध प्रशासनांमार्फत कोरोना संदर्भातली सर्व दक्षता बाळगण्याचे काम सुरू झाले आहे. विभागाच्यावतीने औषध खरेदी इंजेक्शनची उपलब्धता करून देणे, तसेच सर्व औषधांची गुणवत्ता तपासणे याबाबत विभाग दक्षता घेऊन काम करीत आहे. त्यामुळे राज्य सरकार चौथ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज झाले असल्याची माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

हेही वाचा -Piyush Goyal Filed Rajya Sabha Nomination : शिवसेनेने केलेला विश्वासघाताचा वचपा काढणार - पियूष गोयल

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details