मुंबई - माजी केंद्रीय मंत्री एस. जयपाल रेड्डी यांच्या निधनाबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. रेड्डी यांचे आज हैद्राबादमधील रुग्णालयात निधन झाले आहे.
जयपाल रेड्डींच्या निधनावर राज्यपाल विद्यासागर राव झाले भावूक - राष्ट्रीय राजकारण
जयपाल रेड्डी हे तेलंगाणातील उत्कृष्ट संसदपटू होते. जवळ जवळ दोन दशके देशाच्या राष्ट्रीय राजकारणावर त्यांचा प्रभाव होता. उत्तम प्रशासक आणि एक प्रभावी वक्ता असलेले जयपाल रेड्डी यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीमध्ये अनेक मंत्रीपदे भूषविली.

जयपाल रेड्डी आणि मी उस्मानिया विद्यापीठाचे विद्यार्थी होतो, त्यामुळे माझा त्यांच्याशी अनेक दशकांपासून घनिष्ठ परिचय होता. आमच्यात तात्विक मतभेद असले तरी मला जयपाल रेड्डी यांच्याबद्दल अतिशय आदर होता. त्यांच्या निधनामुळे तेलंगाणाने एक निष्ठावान लोकप्रतिनिधी गमावला आहे. असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.