महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चक्रीवादळामुळे शेकडो कोळी बांधवांची कुटुंबं उध्वस्त - महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती - चक्रीवादळा बद्दल बातमी

चक्रीवादळामुळे शेकडो कोळी बांधवांची कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. यावेळी शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ, असा इशाराही कोळी बांधवांनी सरकारला दिला आहे.

Maharashtra Fishermen's Action Committee says  cyclone destroyed families of fishermen
चक्रीवादळामूळे शेकडो कोळी बांधवांचे कुटुंब उध्वस्त - महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

By

Published : May 21, 2021, 7:11 PM IST

मुंबई -चक्रीवादळाचा फटका कोकण किऱ्यावरील मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. १५० हून अधिक बोटींचे यात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने याचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने राज्य सरकारकडे केली आहे. शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ, असा इशाराही कोळी बांधवांनी सरकारला दिला आहे.

चक्रीवादळामुळे शेकडो कोळी बांधवांची कुटुंबं उध्वस्त - महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

हेही वाचा -औरंगाबादेत अल्पवयीन सावत्र बापाने केला दीड वर्षाच्या चिमुरडीचा खून, प्रेत पुरून दिली गुन्ह्याची कबुली

अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाने किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा दिला. वादळाच्या प्रभावाने अनेकांचे अतोनात नुकसान झाले. मुंबईच्या ससून डॉक बंदरात नुकसान झाले आहे. मच्छिमारांच्या जाळ्यांसह इंधनाचे यात फार मोठे नुकसान आहे. राज्यभरात एकंदरीत दीडशेहून अधिक बोटी तुटल्या. ससून डॉकमध्ये 52 मच्छीमार बोटींची नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्ती ओढवते त्यावेळी राज्य शासनाकडून तात्काळ पाच लाख मदतीची घोषणा केली जाते. मच्छिमारांच्या तोंडाला मात्र पाने पुसण्याचा प्रयत्न करण्यात येतो. आताही चक्रीवादळाने मच्छीमारांचे मोठे नुकसान केले आहे. राज्य शासनाने त्यांचा पंचनामा करून जेवढे नुकसान झाले तेवढी भरपाई द्यावी, अशी मागणी समितीचे सरचिटणीस प्रफुल्ल भोईर यांनी केली आहे. तसेच राज्य शासनाने मच्छीमारांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन छेडू असा इशारा भोईर यांनी दिला आहे.

हेही वाचा -पंतप्रधानांनी गुजरात प्रमाणे इतर राज्यांना देखील मदत करावी - अजित पवार

नुकसान खूप मोठे आहे. बोट सहा लाख किंमतीची असून त्याचा खर्च दीड ते दोन लाख रुपये येणार आहे. शासनाने आम्हाला मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे, असे नरेश चंद्रकांत तांडेल यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details