मुंबई - मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आज आग लागली होती. मजल्यावरील एसी डक्टमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालयाजवळ ही आग लागली. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे.
मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे आग... अग्निशमन दलाकडून आग अटोक्यात
हेही वाचा...#Corona: मुंबईत नव्या 47 रुग्णांची नोंद; तर, एकूण रुग्ण संख्या 170
याआधीही 2012 च्या जून महिन्यात मंत्रालयाला भीषण आग लागली होती. आतापर्यंत मंत्रालयात लागलेली ही सर्वात मोठी आग होती. आज मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालयाजवळ ही आग लागली होती.
मंत्रालयातील चौथ्या मजल्यावरील एसी डकमध्ये लागली होती आग...
दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटद्वारे या घटनेची माहिती देण्यात आली असून या घटनेत, मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.