मुंबई- राज्याचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. त्यापूर्वी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सादर होणार आहे.
विधिमंडळात सादर होणाऱ्या आर्थिक पाहणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फडणवीस सरकारच्या काळात उद्योग, शेती आणि सिंचनाच्या क्षेत्रांमध्ये राज्याने काय प्रगती केले याचे वस्तुनिष्ठचित्र आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट होणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक पाहणी अहवाल होणार सादर हेही वाचा-पुरवणी मागण्यांनी राज्य सरकारच्या वित्तीय शिस्तीला 'ग्रहण'
विरोधकांनी 'नागरिकत्व सुधारणा कायदा'च्या समर्थनार्थ विधानसभेत प्रस्ताव मांडून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विधिमंडळात बुधवारी (४ मार्च) कॅगचा अहवाल सादर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधक 'नागरिकत्व सुधारणा कायदा'च्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांमध्ये बेबनाव करण्याचा प्रयत्न करणार आहे.
हेही वाचा-VIDEO: अर्थसंकल्प सोप्या भाषेत! पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात राजकीय नेत्यांची टोलेबाजी
उद्या, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करणार आहेत.