महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात एकाच दिवशी अडीच हजार नव्या रुग्णांची नोंद, तर ८५ नवे बळी..

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख १९ हजार ४१७ नमुन्यांपैकी ५९ हजार ५४६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६ लाख १२ हजार ७४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार १२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच, राज्यात आज ८५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Maharashtra COVID-19 update cases rises to 59 thousand 546
राज्यात एकाच दिवशी अडीच हजार नव्या रुग्णांची नोंद, तर ८५ नवे बळी..

By

Published : May 28, 2020, 9:47 PM IST

मुंबई :राज्यात आज कोरोनाच्या २,५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६९८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५९ हजार ५४६ पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख १९ हजार ४१७ नमुन्यांपैकी ५९ हजार ५४६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६ लाख १२ हजार ७४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार १२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच, राज्यात आज ८५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू -

ठाणे- ४९ (मुंबई ३८, वसई विरार ४, ठाणे ४, नवी मुंबई २, रायगड १), नाशिक- १ (जळगाव १), पुणे- २६ (पुणे मनपा १०, सातारा ९, सोलापूर मनपा ७), औरंगाबाद- ३, लातूर-१ (नांदेड मनपा), अकोला- ५ (अकोला मनपा ५). आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६० पुरुष तर २५ महिला आहेत. तर, ६० वर्षे किंवा त्यावरील ४५ रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ९ जण ४० वर्षांखालील आहे. या ८५ रुग्णांपैकी ४५ जणांमध्ये ( ५३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १५ मे ते २५ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ४८ मृत्यूंपैकी मुंबई २२, सोलापूर -५ , अकोला ४, औरंगाबाद ३, सातारा -३, ठाणे -३, वसई विरार -३, जळगाव -१, नांदेड -१, नवी मुंबई -१, पुणे -१ आणि रायगड येथील १ मृत्यू आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील..

  • मुंबई महानगरपालिका : बाधीत रुग्ण- (३५,४८५), बरे झालेले रुग्ण- (८६५०), मृत्यू- (११३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५६९४)
  • ठाणे : बाधीत रुग्ण- (८२२०), बरे झालेले रुग्ण- (२३००), मृत्यू- (१५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७६५)
  • पालघर : बाधीत रुग्ण- (८२५), बरे झालेले रुग्ण- (२७३), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२९)
  • रायगड : बाधीत रुग्ण- (९४४), बरे झालेले रुग्ण- (४८८), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२८)
  • नाशिक : बाधीत रुग्ण- (१०४३), बरे झालेले रुग्ण- (७५५), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३६)
  • अहमदनगर : बाधीत रुग्ण- (९२), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)
  • धुळे : बाधीत रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (६७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)
  • जळगाव : बाधीत रुग्ण- (५२६), बरे झालेले रुग्ण- (२३९), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३५)
  • नंदूरबार : बाधीत रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९)
  • पुणे : बाधीत रुग्ण- (६८९६), बरे झालेले रुग्ण- (३२४२), मृत्यू- (३०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३५३)
  • सोलापूर : बाधीत रुग्ण- (७११), बरे झालेले रुग्ण- (३०३), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४९)
  • सातारा : बाधीत रुग्ण- (४२९), बरे झालेले रुग्ण- (१२८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८५)
  • कोल्हापूर : बाधीत रुग्ण- (३५१), बरे झालेले रुग्ण- (३६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१४)
  • सांगली : बाधीत रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)
  • सिंधुदुर्ग : बाधीत रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)
  • रत्नागिरी : बाधीत रुग्ण- (२०४), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२३)
  • औरंगाबाद : बाधीत रुग्ण- (१३७०), बरे झालेले रुग्ण- (८७९), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३१)
  • जालना : बाधीत रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३)
  • हिंगोली : बाधीत रुग्ण- (१४३), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)
  • परभणी : बाधीत रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)
  • लातूर : बाधीत रुग्ण- (१०७), बरे झालेले रुग्ण- (५०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)
  • उस्मानाबाद : बाधीत रुग्ण- (५४), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२)
  • बीड : बाधीत रुग्ण- (४१), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)
  • नांदेड : बाधीत रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३)
  • अकोला : बाधीत रुग्ण- (५२९), बरे झालेले रुग्ण- (२५०), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५०)
  • अमरावती : बाधीत रुग्ण- (१९७), बरे झालेले रुग्ण- (९०), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३)
  • यवतमाळ : बाधीत रुग्ण- (११६), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)
  • बुलढाणा : बाधीत रुग्ण- (५५), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)
  • वाशिम : बाधीत रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३)
  • नागपूर : बाधीत रुग्ण- (४९५), बरे झालेले रुग्ण- (३३६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०)
  • वर्धा : बाधीत रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)
  • भंडारा : बाधीत रुग्ण- (२०), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)
  • गोंदिया : बाधीत रुग्ण- (५१), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०)
  • चंद्रपूर : बाधीत रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)
  • गडचिरोली : बाधीत रुग्ण- (२८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)
  • इतर राज्ये : बाधीत रुग्ण- (५४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)

एकूण :बाधीत रुग्ण-(५९,५४६), बरे झालेले रुग्ण- (१८,६१६), मृत्यू- (१९८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टीव्ह रुग्ण-(३८,९३९)

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २८८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील ११९ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे रुग्ण डिस्चार्ज माहिती आज दुपारी ३ वाजेपर्यंतची आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट २८१६ झोन क्रियाशील असून आज एकूण १७ हजार २११ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.६१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details