मुंबई - राज्यात रविवारी कोरोना विषाणूच्या ५ हजार ५०८ रुग्णांची नोंद झाली. सोमवारी त्यात घट होऊन ४ हजार ५०५ रुग्णांची नोंद झाली. त्यात मंगळवारी वाढ होऊन ५ हजार ६०९ रुग्णांची नोंद झाली. आज बुधवारी त्यात किंचित घट होऊन ५ हजार ५६० नवीन रुग्णांची नोंद झाली. तर सोमवारी ६८ मृत्यूंची नोंद झाली होती त्यात मंगळवारी वाढ होऊन १३७ मृत्यूंची नोंद झाली. आज त्यात वाढ होऊन १६३ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात गेले काही दिवस रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार सुरू आहे.
६ हजार ९४४ रुग्णांना डिस्चार्ज -
राज्यात मंगळवारी ६,९४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,६६,६२० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८२ टक्के एवढे झाले आहे. मंगळवारी राज्यात ५,५६० नवीन रुग्णांचे निदान झाले असून, १६३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३४,३६४ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०१,१६,१३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६९,००२ (१२.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,०१,३६६ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ६४,५७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.