मुंबई - राज्यात कोरोनाची तिसरी लाट ( Corona Third Wave ) आटोक्यात येण्यास सुरुवात झाली असून गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्येत मोठी घट दिसून येत आहे. आज ( शुक्रवारी ) दिवसभरात 24 हजार रुग्णांची नोंद ( 24 Thousand Corona Patients ) झाली. तर बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. मृतांच्या आकडा मात्र वाढला असून आज 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णही अडीच लाखाच्या आसपास आहेत. तर दुसरीकडे ओमायक्रॉनचे 110 रुग्ण आढळून आल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने डोके वर काढले. वाढत्या प्रादुर्भावमुळे कडक निर्बंध लागू केले. मात्र गेल्या दोन दिवसांपासून रुग्ण संख्येत घसरण होताना दिसून येत आहे. मंगळवारी 33 हजार 914 तर बुधवारी 33 हजार 756 रुग्ण आढळून आले होते. गुरुवारी 25 हजार रुग्णांची नोंद झाली होती. मात्र आज (शुक्रवारी) 24 हजार 948 बाधितांची नोंद झाली आहे. यापैकी 103 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूदर 1.86 टक्के इतका आहे. दिवसभरात 45 हजार 648 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे होणाऱ्या बधितांचे प्रमाण 94.61 टक्के इतके आहे. आजपर्यंत 72 लाख 42 हजार 649 कोरोना बाधित बरे झाले आहेत. तर 7 कोटी 41 लाख 63 हजार 858 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 76 लाख 55 हजार 554 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 14 लाख 61 हजार 370 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3200 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 2 लाख 66 हजार 586 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
ओमायक्रॉनचे 110 रुग्ण