महाराष्ट्र

maharashtra

राज्यात मृत्यूची संख्या वाढली, रुग्णसंख्येत किंचित घट; २२४ रुग्णांचा मृत्यू

रविवारी ९ हजार रुग्ण आढळून आले होते. त्यात घट होऊन काल शुक्रवारी ६७५३ रुग्ण आढळून आले होते. आज शनिवारी त्यात आणखी घट होऊन ६२६९ नवे रुग्ण आढळून आहेत. काल १६७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज त्यात वाढ होऊन २२४ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.०९ टक्के इतका होता त्यात वाढ होऊन तो २.१ टक्के झाला आहे.

By

Published : Jul 24, 2021, 9:26 PM IST

Published : Jul 24, 2021, 9:26 PM IST

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट

मुंबई - राज्यात आलेली कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यातील कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत चढउतार दिसून येत आहे. रविवारी ९ हजार रुग्ण आढळून आले होते. त्यात घट होऊन काल शुक्रवारी ६७५३ रुग्ण आढळून आले होते. आज शनिवारी त्यात आणखी घट होऊन ६२६९ नवे रुग्ण आढळून आहेत. काल १६७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज त्यात वाढ होऊन २२४ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.०९ टक्के इतका होता त्यात वाढ होऊन तो २.१ टक्के झाला आहे.

७३३२ रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात आज ७३३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,२९,८१७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३५ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ६,२६९ नवीन रुग्णाांचे निदान झाले असून २२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३१,४२९ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६६,४४,४४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,५८,०७९ (१३.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२७,७५४ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ९३,४७९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यूदर वाढला -

सोमवारी १९ जुलैला मृत्यूच्या संख्येत घट होऊन ६६ मृत्यूची नोंद झाली होती. मंगळवारी २० जुलैला त्यात वाढ होऊन १४७ मृत्यूची नोंद झाली, बुधवारी २१ जुलैला त्यात किंचित वाढ होऊन १६५ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. गुरुवारी २२ जुलैला त्यात घट होऊन १२० मृत्यूंची नोंद झाली. शुक्रवारी २३ जुलैला पुन्हा मृत्युसंख्येत वाढ होऊन १६७ मृत्यूची नोंद झाली. काल राज्यात मृत्युदर २.०९ टक्के इतका नोंदवण्यात आला होता. आज २२४ मृत्यूंची नोंद झाल्याने मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई - ४१०
रायगड - १६७
अहमदनगर - ६१७
पुणे - ५३५
पुणे पालिका - २०२
सोलापूर - ३६५
सातारा - ८६९
कोल्हापूर - ६८८
कोल्हापूर पालिका - २०६
सांगली - ५६२
सिंधुदुर्ग - १५३
रत्नागिरी - १३४

ABOUT THE AUTHOR

...view details