मुंबई -आज राज्यात 1842 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 10 हजार 948 वर पोहोचला आहे. तर, आज 30 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 50 हजार 815 वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.25 टक्के तर मृत्यूदर 2.53 टक्के आहे. गेल्या काही महिन्यात आज सर्वात कमी रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
43 हजार 561 अॅक्टिव्ह रुग्ण -
राज्यात आज 3080 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 15 हजार 344 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 42 लाख 57 हजार 998 नमुन्यांपैकी 20 लाख 10 हजार 948 नमुने म्हणजेच 14.10 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 7 हजार 971 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 43 हजार 561 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.