महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

COVID-19 : राज्यात एकाच दिवसात ७२ नवे रुग्ण, एकूण संख्या ३०२!

मुंबईमध्ये सर्वाधिक ५९ नवे रुग्ण आज आढळून आले. तर पुणे, वाशी, नवी मुंबई, विरार, कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यामध्ये प्रत्येकी दोन नवे रुग्ण आढळून आले. तसेच, अहमदनगरमध्येही तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Maharashtra Corona Update total reaches to 302
COVID-19 : राज्यात एकाच दिवसात आढळले ७७ नवे रुग्ण, एकूण संख्या ३०२ वर!

By

Published : Mar 31, 2020, 6:57 PM IST

Updated : Mar 31, 2020, 9:02 PM IST

मुंबई - मंगळवारी एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल ७२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३०२वर पोहोचली आहे. आज दिवसभरात आढळलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आढळले आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक ५९ नवे रुग्ण आज आढळून आले. तर पुणे, वाशी, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यामध्ये प्रत्येकी दोन तसेच वाशी आणि विरार येथे प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळून आला. तसेच, अहमदनगरमध्येही तीन नवे रुग्ण आढळले आहेत.

कोरोना निदानासाठी देशभरातील प्रयोगशाळांचे जाळे विस्तार करण्यात आला असून, 'आयसीएमआर'च्या अनुमतीने सध्या राज्यात १० शासकीय आणि १३ खाजगी अशा एकूण २३ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी तयार झाल्या आहेत. यातील खासगी प्रयोगशाळांकडील अहवालांचे मूल्यमापन करून त्यानंतर त्यांचे अहवाल अंतिम करण्यात येत आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात मुंबईमध्ये एकूण १५१, पुण्यात (शहर आणि ग्रामीण) २५, ठाणे मंडळातील इतर महानगरपालिकांमध्ये ३६, नागपुरात १६, यवतमाळमध्ये ४, अहमदनगरमध्ये ८ आणि बुलडाण्यात ३ रुग्ण आढळून आले आहेत. तर सातारा आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव आणि नाशिकमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. तसेच राज्यात गुजरातमधील एक रुग्णही आढळून आला आहे.

राज्यात आज एकूण ४०६ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६,३३१ नमुन्यांपैकी ५,७८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर, ३०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३९ करोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २३ हजार ९१३ व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून १, ४३४ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

हेही वाचा :जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांच्या पुढे; 39 हजार दगावले

Last Updated : Mar 31, 2020, 9:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details