मुंबई -राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. यामुळे गेल्या दहा दिवसात राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली. मात्र आता ही संख्या पुन्हा वाढू लागली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अद्यापही पुणे, ठाणे, सातारा, अहमदनगर, सांगली, सोलापूर, मुंबई या जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर गोंदिया, नंदुरबार, वर्धा, भंडारा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यात सर्वात कमी अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ
राज्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आजपर्यंत कोरोनाच्या दोन लाटा आल्या असून त्या दोन्ही लाटा आटोक्यात आल्या आहेत. यामुळे राज्यात दिवसाला ३ ते ५ हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत. नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. २० ऑगस्ट रोजी ५५ हजार ४५४ अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. २५ आणि २६ ऑगस्टला ५० हजार अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत किंचित वाढ होऊन दिवसाला ५१ हजार इतक्या अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद होत आहे.
'या' जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण
राज्यात ३१ ऑगस्ट रोजी ५१ हजार २३८ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे पुणे येथे आहेत. पुण्यात १३५१५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल ठाणे ७०८१, सातारा ५६०२, अहमदनगर ५४४१, सांगली ४२६०, सोलापूर ३७३७, मुंबई ३४६९, कोल्हापूर १३९७, रत्नागिरी येथे १०४५ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी गोंदिया येथे २, नंदुरबार येथे ३, वर्धा ५, भंडारा ७, वाशिम ८ तर यवतमाळ येथे ८ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.
'कोविडची लाट संपलेली नाही'