मुंबई - राज्यात आलेली कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यातील कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत घट दिसून येत आहे. रविवारी १८ जुलैला ९ हजार रुग्ण आढळून आले होते. त्यात घट होऊन शुक्रवारी ६७५३, शनिवारी ६२६९ तर रविवारी ६८४३ रुग्णांची नोंद झाली आहे. आज त्यात आणखी घट होऊन ४,८७७ रुग्णांची नोंद झाली आहे. आज ५३ मृत्यूची नोंद झाल्याने मृत्युदर २.०९ टक्के नोंदवण्यात आला आहे.
११,०७७ रुग्णांना डिस्चार्ज -
राज्यात आज ११,०७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,४६,१०६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४३ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ४,८७७ नवीन रुग्णाांचे निदान झाले असून ५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३१,५५२ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६९,९५,१२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,६९,७९९ (१३.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०१,७५८ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ८८,७२९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
मृत्यू दर कमी झाला -
सोमवारी १९ जुलैला मृत्यूच्या संख्येत घट होऊन ६६ मृत्यूची नोंद झाली होती. मंगळवारी २० जुलैला त्यात वाढ होऊन १४७ मृत्यूची नोंद झाली, बुधवारी २१ जुलैला त्यात किंचित वाढ होऊन १६५ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. गुरुवारी २२ जुलैला त्यात घट होऊन १२० मृत्यूंची नोंद झाली. शुक्रवारी २३ जुलैला पुन्हा मृत्युसंख्येत वाढ होऊन १६७ मृत्यूची नोंद झाली. त्यावेळी राज्यात मृत्युदर २.०९ टक्के इतका नोंदवण्यात आला होता. शनिवारी २२४ मृत्यूंची नोंद झाल्याने मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. रविवारी १२३ मृत्यूची नोंद झाल्याने त्यात किंचित घट होऊन २.०९ टक्के इतका मृत्युदर नोंदवण्यात आला होता. आज ५३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.