महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 1931 कोरोना रुग्णांची नोंद; 12 हजार सक्रिय रुग्ण - नवीन कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात आज 1931 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1953 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे 14 रुग्ण तर बीए. 2.75 चे 35 रुग्ण आढळले आहेत.

corona file photo
कोरोना फाईल फोटो

By

Published : Aug 6, 2022, 7:36 PM IST

मुंबई - राज्यात आज (6 ऑगस्ट) 1 हजार 931 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली (Maharashtra Corona Update) आहे. तर 1 हजार 953 रुग्णांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आज 9 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 11 हजार 875 सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या सध्या स्थिर आहे. राज्यात आज 1931 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1953 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे 14 रुग्ण तर बीए. 2.75 चे 35 रुग्ण आढळले आहेत.

राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे 14 रुग्ण तर बीए. 2.75 चे 35 रुग्ण - राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे 14 रुग्ण तर बीए. 2.75 चे 35 रुग्ण आढळले आहे. यामुळे बीए. 5 व्हेरीयंटची रुग्णसंख्या 272 आणि बीए. 2.75 ची रुग्णसंख्या 234 वर गेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details