महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

#MahaCorona: राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

By

Published : Jun 27, 2021, 7:27 AM IST

Updated : Jun 27, 2021, 10:43 PM IST

corona updates news
corona updates news

21:52 June 27

..तरीही डेल्टा व्हेरिएंटला गांभीर्याने घेतले पाहिजे - डॉ. गंगाखेडकर

नवी दिल्ली - 'कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत जास्त वेगाने पसरतो, असा आतापर्यंत कोणताही अहवाल पुढे आलेला नाही. तरीही डेल्टा व्हेरिएंटला गांभीर्याने घेतले पाहिजे', असे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) माजी मुख्य वैज्ञानिक डॉ. रमन आर. गंगाखेडकर यांनी शनिवारी (26 जून) म्हंटले.

21:49 June 27

मुंबईत 1295 रुग्णांना डिस्चार्ज; 746 नवे रुग्ण, 13 रुग्णांचा मृत्यू

मुंबई -मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली असून रुग्णांच्या संख्येत सतत चढ उतार सुरू आहे. रविवारी 746 रुग्णांची नोंद झाली असून 13 मृत्यूंची नोंद झाली. 1 हजार 295 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असून तो 728 दिवसांवर पोहचला आहे.

15:38 June 27

कोल्हापूर जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांहून अधिक

कोल्हापूर -जिल्ह्यातआरटीपीसीआर चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे, जिल्ह्यात आधी लागू असलेले नियम आत्ताही लागू राहणार आहेत. 

11:32 June 27

देशात ५० हजार रुग्णांची नव्याने नोंद, तर १२५८ जणांनी गमावले प्राण

नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत 50,040 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून 57,944 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, दिवसभरात 1,258 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. देशातील एकूण रुग्णांची 3,02,33,183 झाली असून आतापर्यंत 3,95,751 रुग्णांनी प्राण गमावले असून सध्या 5,86,403 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

06:14 June 27

आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक; राज्यात आज ७ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस

मुंबई -कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. आज देखील त्यात अजून एका विक्रमाची भर पडली असून शनिवारी सायंकाळी सातपर्यंत ७ लाख २६ हजार ५८८ नागरिकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत ३ कोटी ९ लाख ७९ हजार ४६० लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

Last Updated : Jun 27, 2021, 10:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details