मुंबई -आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोरोनाची दुसरी लाट नसल्याचे सांगितले असले, तरी देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासात राज्यात २३ हजार ३६५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात कोरोनाचा उद्रेक, आज २३ हजार ३६५ नव्या रुग्णांची नोंद
आज राज्यात ४७४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३० हजार ८८३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७५ टक्के एवढा आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ लाख २१ हजार ३७४ झाली आहे. राज्यात २ लाख ९१ हजार २२१ हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आज राज्यात ४७४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३० हजार ८८३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७५ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज १७ हजार ५५९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ७ लाख ९२ हजार ८३२ रुग्ण बरे झाले असून राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.७१ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ९७ हजार १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.