मुंबई -राज्यात कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात आली असून गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या स्थिरस्थावर असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी सहा हजार रुग्ण सापडले होते. आज तेवढ्याच नव्या बाधितांची नोंद झाल्याचा दावा राज्याच्या आरोग्य विभागाने केला आहे. मृत्यूचा आकडा मात्र वाढला असून सोमवारी 24 तर आज 57 रुग्ण दगावले आहेत, सक्रिय रुग्ण 96 हजार इतके आहेत. ओमयक्रोनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
हेही वाचा -Bully Buy App Case: बुली बाई ॲप प्रकरणातील आरोपी श्वेता सिंगच्या जामीनावर बुधवारी सुनावणी
कोरोनाची तिसरी लाट आणि ओमयक्रोनच्या संकटामुळे राज्यात जानेवारी महिन्यात कठोर निर्बंध लागू केले होते. गर्दीवर नियंत्रण आल्यामुळे कोरोनाची रुगसंख्या घटू लागली. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे.
सोमवारी 6 हजार 436 नव्या बाधितांची नोंद झाली होती. त्यापैकी 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र, गेल्या 24 तासांत तीनशे रुग्णांची घट झाली असून आज 6 हजार 107 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. तर, 57 जण दगावले आहेत. मृत्यूचे प्रमाण 1.83 टक्के इतका स्थिरस्थावर आहे. 16 हजार 35 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 75 लाख 73 हजार 96 करोनाबाधित बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या बधितांचे प्रमाण यामुळे 96.89 टक्के इतके आहे.
7 कोटी 57 लाख 68 हजार 634 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 10.32 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 16 हजार 243 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 39 हजार 490 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 2 हजार 412 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 96 हजार 69 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.