मुंबई -आज राज्यात 2673 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 44 हजार 071 वर पोहचला आहे. तर आज 30 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 310 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.67 टक्के तर मृत्यूदर 2.51 टक्के आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज 1622 रुग्ण बरे -
महाराष्ट्र कोरोना अपडेट - 2673 नवीन रुग्ण, 30 रुग्णांचा मृत्यू - corona latest news
आज राज्यात 2673 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 44 हजार 071 वर पोहचला आहे.
राज्यात आज 1622 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 55 हजार 548 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 49 लाख 77 हजार 683 नमुन्यांपैकी 20 लाख 44 हजार 071 नमुने म्हणजेच 13.65 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 72 हजार 311 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 35 हजार 948 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -
राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा-धारणी पोलीस ठाण्याचे एपीआय अतुल तांबे यांची गळफास घेऊन आत्महत्या