महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Corona Update - राज्यात 2149 नवे रुग्ण, 29 रुग्णांचा मृत्यू

शुक्रवारी 15 ऑक्टोबरला 2 हजार 149 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 29 मृत्यूंची नोंद झाली असून 1 हजार 898 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.37 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

Corona Update - राज्यात 2149 नवे रुग्ण, 29 रुग्णांचा मृत्यू
Corona Update - राज्यात 2149 नवे रुग्ण, 29 रुग्णांचा मृत्यू

By

Published : Oct 15, 2021, 7:51 PM IST

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन आठवडाभर 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. आज शुक्रवारी 15 ऑक्टोबरला 2 हजार 149 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 29 मृत्यूंची नोंद झाली असून 1 हजार 898 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.37 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

29,782 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 2149 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 88 हजार 429 वर पोहचला आहे. तर आज 29 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 734 वर पोहचला आहे. आज 1 हजार 898 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 15 हजार 316 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.37 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 8 लाख 9 हजार 54
नमुन्यांपैकी 65 लाख 88 हजार 429 नमुने म्हणजेच 10.83 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 27 हजार 467 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 29 हजार 782 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 11 सप्टेंबरला 3 हजार 075, 20 सप्टेंबरला 2583, 22 सप्टेंबरला 3608, 27 सप्टेंबरला 2432, 29 सप्टेंबरला 3187, 30 सप्टेंबरला 3063, 1 ऑक्टोबरला 3105, 2 ऑक्टोबरला 2696, 3 ऑक्टोबरला 2692, 4 ऑक्टोबरला 2026, 5 ऑक्टोबरला 2401, 6 ऑक्टोबरला 2876, 7 ऑक्टोबरला 2681, 8 ऑक्टोबरला 2620, 9 ऑक्टोबरला 2486, 10 ऑक्टोबरला 2294, 11 ऑक्टोबरला 1736, 12 ऑक्टोबरला 2069, 13 ऑक्टोबरला 2219, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 2 सप्टेंबरला 55, 6 सप्टेंबरला 37, 20 सप्टेंबरला 28, 21 सप्टेंबरला 70, 1 ऑक्टोबरला 50, 2 ऑक्टोबरला 49, 3 ऑक्टोबरला 41, 4 ऑक्टोबरला 26, 5 ऑक्टोबरला 39, 6 ऑक्टोबरला 90, 7 ऑक्टोबरला 49, 8 ऑक्टोबरला 59, 9 ऑक्टोबरला 44, 10 ऑक्टोबरला 28, 11 ऑक्टोबरला 36, 12 ऑक्टोबरला 43, 13 ऑक्टोबरला 49, 14 ऑक्टोबरला 35, 15 ऑक्टोबरला 29 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details