मुंबई -कोरोनाची रुग्णसंख्या घटत असताना आज किंचित वाढ झाल्याचे समोर आले आहे. दिवसभरात 2 हजार 831 रुग्ण सापडले असून, आज 35 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 1 हजार 966 रुग्ण सापडले होते. ओमयक्रोनचे रुग्ण देखील वाढले असून, आज 351 बाधितांची नोंद झाल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
हेही वाचा -Sanjay Raut Press Video: ...तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील - संजय राऊत
राज्यात कोरोना उतरणीला लागला आहे. रुग्णसंख्येत दिवसागणिक चढ उतार दिसून येत आहेत. आज 2 हजार 831 बाधित आढळून आले. सोमवारी हा आकडा 1 हजार 966 रुग्ण इतका होता. यात किंचित वाढ झाल्याचे दिसते. तर, आज 35 जणांचा मृत्यू झाला आहे. 8 हजार 695 रुग्ण बरे झाले असून, बरे होण्याचे प्रमाण 97.73 टक्के आहे.
आजपर्यंत 7 कोटी 66 लाख 39 हजार 114 कोविड चाचण्या केल्या. त्यापैकी 10.24 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 46 हजार 746 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 14 हजार 531 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 1 हजार 544 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 30 हजार 547 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.