मुंबई -राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. गेल्या काही दिवसात 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. सोमवारी 686 रुग्ण आढळून आले होते त्यात काल मंगळवारी वाढ होऊन 886 रुग्ण आढळून आले आहेत. आज त्यात आणखी वाढ होऊन 1003 रुग्णांची नोंद झाली आहे. आज 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1052 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.64 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
11,766 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 1003 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 26 हजार 875 वर पोहचला आहे. तर आज 32 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 668 वर पोहचला आहे. आज 1052 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 70 हजार 791 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.64 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 42 लाख 67 हजार 953 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी
10.31 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 517 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 11 हजार 766 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
रुग्णसंख्येत चढ उतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 25 ऑक्टोबरला 889, 1 नोव्हेंबरला 809, 2 नोव्हेंबरला 1078, 3 नोव्हेंबरला 1193, 4 नोव्हेंबरला 1141, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 10 नोव्हेंबरला 1094, 11 नोव्हेंबरला 997, 12 नोव्हेंबरला 925, 13 नोव्हेंबरला 999, 14 नोव्हेंबरला 956, 15 नोव्हेंबरला 686, 16 नोव्हेंबरला 886, 17 नोव्हेंबरला 1003 रुग्ण आढळून आले आहेत.
मृत्यू संख्येत चढ उतार -
तर 28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26, 31 ऑक्टोबरला 20, 1 नोव्हेंबरला 10, 2 नोव्हेंबरला 48, 3 नोव्हेंबरला 39, 4 नोव्हेंबरला 32, 5 नोव्हेंबरला 17, 6 नोव्हेंबरला 10, 7 नोव्हेंबरला 16, 8 नोव्हेंबरला 15, 9 नोव्हेंबरला 27, 10 नोव्हेंबरला 17, 11 नोव्हेंबरला 28, 12 नोव्हेंबरला 41, 13 नोव्हेंबरला 49, 14 नोव्हेंबरला 18, 15 नोव्हेंबरला 19, 16 नोव्हेंबरला 34, 17 नोव्हेंबरला 32 मृत्यूंची नोंद झाली आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 272
अहमदनगर - 60
पुणे - 107
पुणे पालिका - 110
पिंपरी चिंचवड पालिका - 41