मुंबई - राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत असली तरी, मृत्यूचा आकडा मात्र स्थिर स्थावर आहे. आज दिवसभरात 47 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 80 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. ओमायक्रोनचा एकही रुग्ण सापडलेला नाही, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
हेही वाचा -Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या वतीने ३१ लाख ३ हजार ७१७ सूर्य नमस्कारांचे योगदान
राज्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. सक्रिय, क्वारंटाईन आणि बाधित रुग्ण देखील कमालीचे घटत आहेत. आज 1 हजार 80 रुग्णांची नोंद झाली. तर, 47 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची टक्केवारी 1.82 टक्के इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.96 टक्के असून, आज 2 हजार 488 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 76 लाख 99 हजार 623 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
कोविडचे निदान करण्यासाठी आजपर्यंत 7 कोटी 73 लाख 83 हजार 579 कोविड चाचण्या केल्या. त्यापैकी 10.16 टक्के इतके म्हणजेच, 78 लाख 60 हजार 317 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 74 हजार 560 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 958 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 13 हजार 70 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.