महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - महाराष्ट्र कोरोना रुग्ण

Maharashtra Corona situation LIVE updates on ETV Bharat
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

By

Published : May 25, 2021, 6:17 AM IST

Updated : May 25, 2021, 12:23 PM IST

12:22 May 25

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद..

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली ठळक माहिती : 

  • सर्व जिल्हाधिकाऱ्यांना रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिलेत.
  • १८ जिल्ह्यांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

12:20 May 25

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद..

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली ठळक माहिती : 

  • कोरोना लसीच्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद नाही.
  • कोणत्याही राज्याच्या टेंडरला मिळत नाहीये प्रतिसाद.
  • केंद्रानेच आता ग्लोबल टेंडर काढावे आणि राज्याला लस पुरवावी.
  • केंद्राने लसीकरणासाठी ठोस पावले उचलावीत.

12:17 May 25

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद..

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली ठळक माहिती : 

  • राज्यातील कोरोना मृत्यूदर १.५ टक्क्यांपर्यंत घटला.
  • राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्के.
  • राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट १२ टक्क्यांपर्यंत घटला.
  • आशा वर्कर्सना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देणार.

11:54 May 25

लोकसहभागातून पोहेगाव येेथे सुुरु झालेले कोविड सेंटर..

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचायत, पोहेगाव नागरी पतसंस्था व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 30 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. लोकसहभागातून सुरू झालेल्या या कोविड सेंटरसाठी परिसरातील व्यापारी, वकील, डॉक्टर्स, शिक्षक, सामाजिक संस्था, क्रीडा मंडळे, विविध गावातील संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी वस्तूस्वरूपात व आर्थिक मदतीचे धनादेश दिले आहेत.

11:22 May 25

महापालिका केंद्रावरील लसीकरण आज बंद.....

पुणे शहरात सध्या खासगी रुग्णालयामध्ये लसीकरण सुरू झालेले असताना , आज 25 मे रोजी मात्र महापालिकेच्या लसीकरण केद्रावर लशींच्या उपलब्धतेअभावी लसीकरण बंद आहे. महापालिकेला लसीचा पुरवठा न झाल्याने महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवरील लसीकरण ठप्प झाले आहे. तर गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू झालेले खासगी रुग्णालयांमधील लसीकरण मात्र सुरू राहणार आहे.

10:41 May 25

कोविड सेंटर मधून न विचारताच निघून जातात रूग्ण; आतापर्यंत शिरूर च्या कोविड सेंटर मधून 22 जणांचे पलायन

बीड- कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी शासकीय बीड सेंटरवर उपचार सुरू आहेत मात्र या सेंटरवर जिल्हा ग्रामीण आरोग्य विभागाचे विशेष लक्ष नसल्याची बाब समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील एका शासकीय सेंटर वरून कोरोना ची सौम्य लक्षण असलेल्या 22 जणांनी कोवीड सेंटर प्रशासनाला न सांगताच अर्धवट उपचार घेऊन पलायन केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे इतरांना कोरोना ची लागण होण्याचा धोका वाढला आहे. अर्धवट उपचार घेऊन पळून गेलेल्या त्या रुग्णांवर गुन्हा दाखल झाला आहे.

09:08 May 25

लॉकडाऊन बाबत जो निर्णय मुख्यमंत्री घेतील, तो आम्हाला स्वीकारावा लागेल- मंत्री यशोमती ठाकूर

1 जून रोजी राज्यातील लॉकडाऊन संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पुन्हा राज्यात लॉकडाऊन वाढणार काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व अमरावती जिल्हाच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, परिस्थिती काय आहे त्यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे. कोरोना परिस्थिती खूप कमी झाली अशातलाही भाग नाही, तसेच जास्त झाली हाही भाग नाही. त्यामुळे लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला स्वीकारावा लागेल, असे मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

07:02 May 25

म्युकरमायकोसिस : उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली आढावा बैठक

राज्यातील म्युकरमायकोसिस संदर्भात आढावा आणि उपाययोजनांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बैठक बोलावली आहे. सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही बैठक सुरू होईल.

06:16 May 25

मास्क वापरत नसाल तर हे पहा; तीन महिन्यांत तब्बल ८१ लाख ४७ हजार दंड

सातारा : कोविडने जिल्ह्यात हाहाकार माजवला असताना अद्यापी लोकांमध्ये विनामास्क फिरण्याची बेफीकीरी दिसून येते. अशा ३० हजार १०९ बेजबाबदार नागरीकांवर पोलिसांनी जिल्ह्यात केसेस करुन गेल्या तीन महिन्यात तब्बल ८१ लाख ४७ हजार ६०० दंड वसुल केला. ४ हजार ४०९ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. तर विनाकारण फिरणारे व ई पास चे उल्लंघन करणा-यांकडून १९ लाख २० हजार ८०० रुपये दंड वसुल करण्यात आला.

06:15 May 25

नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट..सोमवारी आढळले 94 पॉझिटिव्ह रूग्ण..

नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोनाच्या रूग्णसंख्येत घट होताना पहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एका दिवसांत हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्येचा विक्रमी आकडा पाहणाऱ्या नवी मुंबई शहरात सोमवारी 94 रुग आढळुन आले आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळत आहे.

06:02 May 25

राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

मुंबई -राज्यात आज (दि. 24 मे) 22 हजार 122 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. एकूण बाधितांचा आकडा 56 लाख 2 हजार 19 वर पोहोचला आहे. तर आज (सोमवार)361 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात 42 हजार 320 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 51 लाख 82 हजार 592 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांचीस्थिती

  • 24 तासांत 22 हजार 122 रुग्णांची नोंद.
  • राज्यात आतापर्यंत 56 लाख 2 हजार 19 एकूण रुग्णांची नोंद.
  • राज्यात 24 तासांत 42 हजार 320 रुग्णांची कोरोनावर मात.
  • राज्यात आतापर्यंत 51 लाख 82 हजार 592 रुग्णांची कोरोनावर मात.
  • राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 27 हजार 580.
  • राज्यात 24 तासांत 361 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
Last Updated : May 25, 2021, 12:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details