देशात गेल्या २४ तासांमध्ये ४३ हजार ३९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ४४ हजार ४५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, ९११ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ कोटी, ७ लाख ५२ हजार ९५० वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत देशात ४ लाख, ५ हजार ९३९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत देशातील दोन कोटी, ९८ लाख, ८८ हजार २८४ लोकांनी कोरोनावर मात केली असून, ४ लाख, ५८ हजार ७२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
#MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स, वाचा एका क्लिकवर..
11:37 July 09
देशात ४३ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद..
11:33 July 09
बीकेसीमधील लसीकरण थेट सोमवारी होणार सुरू..
मुंबई : बीकेसी जम्बो कोविड सेंटरमधील लसीकरण आज बंद आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसून येत आहे. लोकांना लसीकरणासाठी थेट सोमवारी येण्यास सांगण्यात येत आहे.
09:30 July 09
मुंबईत आज लसीकरण बंद
मुंबई - लसीकरण मोहीम सुरू असून सतत लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण बंद ठेवावे लागत आहेत. तसेच कमी लसीकरण केंद्रांवर लस द्यावी लागत आहे. गुरूवारीही लसीचा तुटवडा असल्याने काही केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. आज (शुक्रवार) लसीचा तुटवडा असल्याने पालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद राहील अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
06:30 July 09
मुंबई : मनपाकडून 'या'ठिकाणी मिळणार लसीकरणाची अचूक माहिती
मुंबई - लसीकरणा दरम्यान लसीचा तुटवडा असल्याने वेळोवेळी लसीकरणाच्या वेळेत बदल करावा लागतो. मुंबईत कधी कधी लसीकरण बंद असते, याची माहिती पालिका नागरिकांना ट्विटरवरून देत होती. मात्र, लसीकरणाची माहिती नागरिकांपर्यंत योग्य प्रकारे मिळत नव्हती. यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊन गोंधळ उडत होता. हा गोंधळ रोखण्यासाठी पालिकेने सोशल मीडिया, पालिकेची वेबसाईट तसेच पालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर लसीकरणाची अचूक वेळ दिली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
06:30 July 09
देशात सर्वाधिक कोरोना बळी महाराष्ट्रात..
नवी दिल्ली - आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना व्हायरसने संक्रमित रुग्णांची संख्या 3 कोटीपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या 24 तासांत 45,892 नव्या रुग्णांची आणि 817 मृत्यूची नोंद झाली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे 44,291 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील रुग्णांचा रिकव्हरी रेट 97.18 वर पोहचला आहे. तर मृत्यूचा दर 1.32 आहे.
आतापर्यंत सर्वांत जास्त 1,23,857 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील मृत्यू दर जास्त आहे. तर सध्या महाराष्ट्रात 117869 जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत 8899 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 58,81,167 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.