मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव देशभर वाढत असताना पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढीचे संकेत दिलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ४२७ झाली आहे. आज दिवसभरात एकूण १,०२६ नव्या रुग्णांचे निदान झाले. तसेच, राज्यात आज ३३९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, आतापर्यंत राज्यभरात ५,१२५ रुग्णांवरील उपचार यशस्वी झाले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २१ हजार ६४५ नमुन्यांपैकी, १ लाख ९५ हजार ८०४ जणांचे अहवाल कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर २४ हजार ४२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ८१ हजार ६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, १५ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज दिवसभरात राज्यात ५३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या एकूण बळींची संख्या आता ९२१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमध्ये सर्वाधिक २८, त्यापाठोपाठ पुणे आणि पनवेलमध्ये प्रत्येकी ६, जळगावमध्ये ५, सोलापूर शहरात ३, ठाण्यात २, तर रायगड, औरंगाबाद आणि अकोला शहरात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २४ महिला आहेत. आज झालेल्या ५३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत, तर २७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ५ रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. या ५३ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये (६६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील रुग्णांची प्रांतनिहाय आकडेवारी (कंसात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या) :
मुंबई महानगरपालिका: १४,९२४ (५५६)
ठाणे: १४० (३)
ठाणे मनपा: १००४ (११)
नवी मुंबई मनपा: ९५५ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: ३८४ (३)
उल्हासनगर मनपा: ५३
भिवंडी निजामपूर मनपा: ३५ (२)
मीरा भाईंदर मनपा: २४३ (२)
पालघर: ३८ (२)
वसई विरार मनपा: २६३ (१०)
रायगड: १२९ (२)
पनवेल मनपा: १४६ (८)
ठाणे मंडळ एकूण: १८,३३७ (६०३)
नाशिक: ८२
नाशिक मनपा: ४३
मालेगाव मनपा: ६१६ (३४)
अहमदनगर: ५४ (३)
अहमदनगर मनपा: १०
धुळे: ९ (३)
धुळे मनपा: ५४ (३)
जळगाव: १५२ (१५)
जळगाव मनपा: ४० (९)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १०८२ (६९)
पुणे: १६७ (५)
पुणे मनपा: २६२१ (१५५)
पिंपरी चिंचवड मनपा: १४९ (४)
सोलापूर: ९
सोलापूर मनपा: ३०८ (१९)
सातारा: १२३ (२)
पुणे मंडळ एकूण: ३३७७ (१८५)
कोल्हापूर: १३ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३४