महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amit Deshmukh On Maharashtra Corona : कोरोना रुग्णांत वाढ; अमित देशमुख म्हणाले, "सर्व व्यवस्थेला सतर्क..."

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली ( Maharashtra Corona Cases Increased ) आहे. त्यापार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्था वाढ करण्यात आली आहे. तसेच, सर्व व्यवस्थेला सतर्क करण्यात आल्याची माहिती अमित देशमुख ( Amit Deshmukh Corona Meeting ) यांनी दिली.

Amit Deshmukh
Amit Deshmukh

By

Published : Jan 6, 2022, 1:55 PM IST

Updated : Jan 6, 2022, 3:00 PM IST

मुंबई : राज्यात कोरोना उद्रेक झाला असून, तीन-चार दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्या दुप्पट होत ( Maharashtra Corona Cases Increased ) आहे. त्या पार्श्वभूमीवर वाढत्या संसर्गामुळे आरोग्य व्यवस्था वाढ केली जाणार आहे. तसेच, दुसऱ्या लाटेप्रमाणे तिसऱ्या लाटेत उपचार करण्याची सूचना केल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख ( Amit Deshmukh On Maharashtra Corona ) यांनी दिली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर अमित देशमुख प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, " सर्व व्यवस्थेला सतर्क करण्यात आले आहे. राज्य सरकारकडे औषध उपचाराची पूर्तता असावी अशा सूचना केल्या आहेत. कोरोनावर उपचारासाठी 75 टक्के ऑक्सिजन बेड तर, 8027 आय सीयू बेडस आहेत. चाचण्या करण्यासाठी 250 सरकारी आणि 80 खासगी लॅब आहे. त्यामध्ये दिवसाला हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे."

अमित देशमुख प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

"डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चाचणी केल्या जाणार आहेत. मार्ड, वैद्यकीय संघटनांच्या मागण्या मान्य करुन त्यावर तातडीने कार्यवाही केली करु. हेल्थ वर्करला सुरक्षा कवच देण्यासाठी आयसीएमारच्या सुचनांनूसार बूस्टर डोससाठी आठ दिवसांत मोहिम सुरु करण्यात येणार आहे. विलगीकरणासाठी व्यवस्था, रुग्ण सेवेत निष्काळजी हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेऊ. सूचनांचे पालन केले तरच लाट रोखू शकतो. त्यामुळे राज्य सरकारच्या सुचनांचे पालन करावे," असे आवाहनही अमित देशमुख यांनी बोलताना केले आहे.

देशात 90 हजारांवर आढळले रुग्ण

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत 90 हजार 928 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर 325 रुग्णांचा मृत्यू झाला. दैनंदिन रुग्णसंख्येत जवळपास 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राज्यात 26 हजार नवे रुग्ण

राज्यात सध्यातरी लॉकडाउन बाबात तर्क वितर्क लढवले जात आहे. त्यातच बुधवारी दिवसभरात 26 हजार 538 नव्या कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे राज्यातल्या सक्रिय रुग्णांचा आकडा 87 हजार 505 वर गेला. त्याचसोबत ओमायक्रॉनच्या एकूण बाधितांचा आकडा वाढून 797 वर गेल्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा -260 Resident Doctors Covid positive : मुंबईतील 260 निवासी डॉक्टर कोरोनाबाधित

Last Updated : Jan 6, 2022, 3:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details