मुंबई :राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत ( Maharashtra Corona And Omicron Cases Increased ) आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून वरिष्ठ न्यायमूर्तीच्या प्रशासकीय समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सोमवार ( दि 4 जानेवारी 2022 ) पासून एक आठवडा न्यायालयीन कामकाज प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला ( Mumbai High Court Working Online And offline )आहे.
यासंदर्भात वरिष्ठ न्यायमूर्तीच्या प्रशासकीय समितीने बैठक घेतली. या बैठकीत राज्य सरकारतर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी तसेच उच्च न्यायालयातील वकील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी रामास्वामी आणि काकाणी यांनी राज्य व मुंबईतील सध्याच्या कोरोना स्थितीची माहिती दिली.