मुंबई-महिलांचा राजकारणातील सहभाग आणखी सक्रीय व्हावा यासाठी प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला ( women chairperson in Congress district committee ) आहे. महिला भगिनींना मकरसंक्रांतीची भेट देत असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ( Nana Patole on Makar Sankrant gift to women ) केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole on women empowerment in politics ) म्हणाले, की काँग्रेस पक्षाने महिलांचा कायमच सन्मान करत त्यांना समान संधी दिली आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल या महत्वाच्या पदावर काँग्रेसने महिलांना संधी दिली. महिलांना राजकारणात महत्वाची जबाबदारी देण्याची काँग्रेसची परंपरा आहे.
हेही वाचा-Misuse Of Ajit Pawar Mobile Number : अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा वापर करून बिल्डरला खंडणीसाठी धमकी;6 जणांना ठोकल्या बेड्या
४० टक्के महिलांना उमेदवारी
पुढे नाना पटोले म्हणाले की, महिलांना राजकीय प्रवाहात सामील करून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने नेहमीच महत्वाची भूमिका बजावलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा क्रांतीकारी निर्णयही काँग्रेस पक्षाच्या सरकारनेच घेतला होता. आताही उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत ४० टक्के महिलांना उमेदवारी देण्याचा क्रांतीकारी निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस व उत्तर प्रदेश प्रभारीप्रियंका गांधी यांनी घेतला. त्याची अमंलबजावणीही सुरू केली आहे. काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत ४० टक्के महिलांना उमेदवारी देऊन त्यांनी नवा आदर्श घालून दिला आहे. ‘लडकी हूँ’ लड सकती हूँ’, ( Ladaki hoon Lad sakati hoon ) अशी घोषणा देत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे.