मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र काँग्रेसने ( Maharashtra Congress on PM speech in Loksabha ) प्रतिक्रिया दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र ृसंदर्भात काढलेले उद्गार अत्यंत दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत. महाराष्ट्राने कधीही परप्रांतीय आणि महाराष्ट्रातील मजुरांमध्ये दुजाभाव केला नाही, असे प्रत्युत्तर कॉंग्रेसने दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र संदर्भात काढलेले उद्गार अत्यंत दुर्दैवी ( Controversial statement of PM in Loksabha ) आहेत. कोरोना काळात परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्राने अतिशय चांगल्या पद्धतीने मदत ( MH helped labors in pandemic ) केली. त्यांना त्यांच्या गावापर्यंत जायला सुविधाही उपलब्ध करून दिली. मात्र असे असतानाही पंतप्रधानांनी महाराष्ट्र संदर्भात काढलेले उद्गार अत्यंत दुर्दैवी आहेत. केवळ एका राज्यातील निवडणुका जिंकण्यासाठी दुसऱ्या राज्याची बदनामी करणे हे सर्वथा चूक आहे.
हेही वाचा-Priyanka Gandhi Goa Elections : बेरोजगारीत गोव्याचा दुसरा क्रमांक -प्रियंका गांधी
पंतप्रधानांना हे शोभत नाही