महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आधुनिकतेच्या वाटचालीत राजीव गांधींचे योगदान - मुख्यमंत्र्यांचे अभिवादन - Rajiv Gandhi Death Anniversary

राजीव गांधींनी देशाला दिलेल्या योगदानाचा उद्धव ठाकरे यांनी अभिवादनात उल्लेख केला आहे. ते म्हणाले, की देशाच्या विज्ञान-तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या वाटचालीत राजीवजींचे योगदान विसरता येणार नाही.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

By

Published : May 21, 2020, 1:15 PM IST

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. राजीव गांधींनी देशातील दूरसंचार आणि संगणक क्षेत्राची पायाभरणी केली. ती आज महत्त्वपूर्ण ठरल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.

राजीव गांधींनी देशाला दिलेल्या योगदानाचा उद्धव ठाकरे यांनी अभिवादनात उल्लेख केला आहे. ते म्हणाले, की देशाच्या विज्ञान-तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या वाटचालीत राजीवजींचे योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या स्मृतिदिनी दहशतवाद आणि हिंसाचाराला मानवी जीवनातून हद्दपार करण्याची शपथ घेऊ या. त्यासाठी अविरत प्रयत्न करणे, हीच राजीव गांधींना श्रद्धांजली ठरेल, असे ठाकरेंनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details